---Advertisement---

“गिलने दोन वर्षांपुर्वीच कसोटीत पदार्पण करायला हवे होते”, पाहा कुणी केलंय हे वक्तव्य

On: रविवार, डिसेंबर 27, 2020 8:54 AM
---Advertisement---

भारताचा युवा आणि प्रतिभावंत फलंदाज शुबमन गिल याने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याऐवजी अंतिम ११ जणांमध्ये गिलची निवड झाली आहे. परंतु, माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्या मते गिलला फार पुर्वीच भारतीय कसोटी संघात संधी मिळायला हवी होती.

एका टिव्ही चॅनलशी बोलताना आगरकर म्हणाले की, “गिलला आता नव्हे तर जवळपास दोन वर्षांपुर्वीच कसोटीत संधी मिळायला हवी होती. तो नेहमी यासाठी तयार होता. तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, गिलमध्ये खूप क्षमता आहे. एवढ्या कमी वेळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे टिकून फलंदाजी करणे सोपे नसते. पण त्याने खेळलेल्या प्रत्येक चेंडूने त्याचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्याला संधी मिळाली आहे. यामध्ये त्याच्या नशीबाचाही थोडाफार हात आहे. आशा करतो की, तो पुढे खूप प्रगती करेल.”

शुबमन गिलची कसोटी सामन्यातील कामगिरी

शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पदार्पणवीर गिल ४५ धावांवर बाद झाला. ६५ चेंडूत ८ चौकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. एवढेच नव्हे तर, त्याने भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारासोबत मिळून ६१ धावांची भागिदारीही साकारली. शेवटी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने यष्टीरक्षक टीम पेनच्या हातून गिलला झेलबाद केले.

फलंदाजीव्यतिरिक्त गिलने क्षेत्ररक्षण विभागातही दमदार प्रदर्शन केले. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशानेचा झेल पकडत युवा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पहिली कसोटी विकेट मिळवून देण्यात मदत केली. गिल आणि सिराज जोडीच्या या विकेटमुळे लॅब्यूशाने अवघ्या ४८ धावांवर बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Live : पहिल्या सत्राखेर भारताच्या ३७ षटकात ३ बाद ९० धावा; गिल, पुजारा संयमी सुरुवातीनंतर बाद

टीम पेनने डाइव्ह मारत एका हाताने पकडला पुजाराचा सुरेख झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

याला म्हणतात प्रतिभा! वयाच्या २१ व्या वर्षी शुबमन गिलने केलाय ‘हा’ कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---