लवकरच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेपुर्वी माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी युवा क्रिकेटपटू शुबमन गिल याला खालील-मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांना वरील-मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवण्यात येईल. त्यामुळे गिल सहाव्या क्रमांकासाठीचा प्रबळ दावेदार असेल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आगरकर म्हणाले की, “सध्याचा भारतीय कसोटी संघ पाहिला तर प्रत्येक फलंदाजामध्ये संघाला दमदार सुरुवात करुन देण्याची क्षमता आहे. निश्चितपणे विहारी आणि रहाणे पुजारासोबत मधल्या फळीत फलंदाजी करतील. त्यामुळे त्याच्या तीन जागा ठरलेल्या आहेत. अशात गिलला सहावा क्रमांक मिळू शकतो. परंतु, माझ्या विचारांच्या उलट बऱ्याच लोकांनी त्याची कसोटी संघातील सलामीवीर फलंदाजाच्या रुपात निवड केली आहे.”
गुलाबी चेंडू सराव सामन्यात उत्तम प्रदर्शन
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत संघात झालेल्या गुलाबी चेंडू सराव सामन्यात शुबमन गिलने खूप चांगले प्रदर्शन केले आहे. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एका डावात अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या डावात गिलचे अर्धशतक केवळ ७ धावांनी हुकले. पहिल्या डावात त्याने ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या डावात त्याने ६५ धावांची धुव्वांदार खेळी नोंदवली आहे.
जरी गिल अधिकतर सामन्यात वरच्या फळीत फलंदाजी करताना दिसला असला. तरी त्याच्यात सहाव्या क्रमांकवर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मात्र अंतिम निर्णय हा भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावर निर्भर करतो.
कधी होणार पहिला कसोटी सामना
१७ डिसेंबर रोजी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना ऍडलेडच्या मैदानावर प्रकाशझोतात खेळला जाणार आहे. हा या मालिकेतील एकमेव दिवसरात्र सामना असेल. १९ जानेवारी रोजी या मालिकेचा शेवट होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर स्मिथला द्यावे उपकर्णधारपद”, अॅडम गिलख्रिस्टने दिला सल्ला
IND Vs AUS A: दिवसरात्र सराव सामना अनिर्णित, मात्र भारतीय संघाला ‘या’ गोष्टींचा फायदा
लॉकी फर्ग्युसनच्या अनुपस्थितीने योजनेत बदल नाही, पाकिस्तानच्या युवा फलंदाजाचे मत