हवेलीतील उरूळी देवाची इथे रविवारी अजित मेगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा युवती उपाध्यक्षा प्रतिक्षा ज्योती महेंद्र बाजारे यांनी केले होते. या स्पर्धेत 700पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.
पहाटे ६ वाजता झुंबा या नृत्यप्रकाराने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी रीलस्टार रोशनी काकडे यांनी सहभागी धावटूंच्या झुंबाचे सेशन घेतले. त्यानंतर 16 वर्षाखालील मुले, 16 वर्षाखालील मुली, 12 वर्षाखालील मुले व 12 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा झाल्या. यावेळी स्पर्धकांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे सर यांनी हजेरी लावली. त्यांच्याच हस्ते प्रथम दोन गटांच्या रेसचे फ्लॅग ऑफ झाले. यावेळी दादांच्या वाढदिवसानिमित्त असा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले. तसेच अशाच स्पर्धा आपल्या देशाला चांगले धावपटू-खेळाडू देतील, अशा विश्वास व्यक्त केला.
यावेळी हवेलीचे तालुका अध्यक्ष प्रशांत भाडळे, शिरूर हवेलीचे तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, युवक तालुकाअध्यक्ष प्रजित आबा हरपळे, वैद्यकीय सेवा प्रदेश कार्याध्यक्ष निनाद दादा टेमगीरे, स्वीकृत नगरसेवक भगवान भाडळे, नाना बाजारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे इत्यादी राजकीय मान्यवर उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेस पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.जयश्री ताई पुणेकर , हडपसर विधानसभा युवती अध्यक्ष सुजाता ताई कटके, महिला हवेली तालुकाध्यक्ष प्रचिदीदी शितोळे देशमुख यांनी मोलाचे सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.महेंद्र बाजारे सर यांच्या उत्तम नियोजनात ही स्पर्धा वैद्यकीय, प्रशासकीय नियमांचे पालन करत पार पडली. स्पर्धेचे सूत्रसंचलन श्री.दत्ता नाना म्हस्के यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.