भारत आणि नामिबिया यांच्यात सोमवारी(९ नोव्हेंबर) आमना-सामना झाला. या सामन्यात भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या पहिल्या काही षटकांमध्ये जास्त धावा दिल्या होत्या, तर दुसरीकडे फिरकी गोलंदाजांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती. आशात भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी भारतीय गोलंदाजांच्या प्रदर्शानावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते टी२० विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चांगले राहिले नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नामिबियाविरुद्ध त्यांच्या पहिल्या तीन षटकांमध्ये २५ धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती. जसप्रीत बुमराह आणि शमी या दोघांपैकी एकही गोलंदाज नामिबियच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण करू शकला नव्हता. असे असले तरी, बुमराहने त्याच्या दुसऱ्या षटकात एक विकेट घेतली आणि नामिबियावर दबाव बनवायला सुरुवात केली.
बुमराहाने या सामन्यात १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने १६ धावा आणि रविचंद्रन अश्विनने २० धावा देऊन प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने या सामन्यात ३९ धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.
या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रांने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर भारतीय गोलंदाजंविषयी मोठी प्रतिक्रिया देली आहे. ते म्हणाले की, “ज्याप्रकारे भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवात केली, त्यामुळे मी थोडा निराश आहे. काही तरी होत आहे, ज्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही. पहिल्या तीन षटकांदरम्यान असे वाटले की, आपण नामिबियासोबत नाही, तर दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळत होतो. आजकाल बुमराह नव्या चेंडूसोबत यॉर्कर किंवा स्लोवर चेंडू टाकत आहे. मोहम्मद शमीसाठीही असेच म्हटले जाऊ शकते. प्रत्येक जण यॉर्कर करत आहे आणि माहीत नाही असे का केले जात आहे. बाउंसर कोणताच गोलंदाज टाकत नाही.”
दरम्यान, नामिबियाविरुद्ध सोमवारी खेळला गेलेला सामना, हा भारताचा विश्वचषकाती शेवटचा सामना होता. विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, पण त्याचा संघाला प्रत्यक्षात काही फायदा मिळाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ साठी आरसीबीने केली मुख्य प्रशिक्षकाची घोषणा; विजेतेपद जिंकण्याचा केला निर्धार
“२०१९ विश्वचषकात शास्त्रींना जाणवली होती रायुडूची कमतरता”
‘त्यांनी भारतीय क्रिकेटचा स्तर उंचावला’; दिग्गजाने शास्त्रींवर उधळली स्तुतीसुमने