भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला फॉर्म परत मिळाल्याचे दिसत होते. शॉ मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघाचा भाग बनू शकला नाहीये. पण नुकतेच इंग्लंडमध्ये रॉयल लंडन कपमध्ये नॉर्थएम्टनशायर संघासाठी शॉ अप्रतिम प्रदर्शन करताना दिसला. पण अशातच त्याला दुखापत झाल्याने संपूर्ण हंगामात त्याला माघार घ्यावी लागली. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने खास प्रतिक्रिया दिली.
पृथ्वी शॉ रॉयल लंडन कप 2023 मध्ये नॉर्थएम्टनशायर संघाचा भाग होता. त्याने हंगामातील सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये 429 धावा केल्या. समरसेट संघाविरुद्ध त्याच्या बॅटमधून अवघ्या 153 चेंडूत 11 षटकार आणि 28 चौकारांच्या मदतीने 244 धावांची खेळी आली. पुढच्याच सामन्यात शॉने शतक ठोकले. पण डरहम संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला श्रेत्ररक्षण करताना दुखापत झाली. याच कारणास्तव संपूर्ण हंगामातून त्याला माघार घ्यावी लागत आहे. शॉ 2021 नंतर भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये. दरम्यानच्या काळात इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. अशात सलामीवीर फलंदाजाल सूर सापडल्यामुळे चाहते आणि जाणकार आनंदात होते. मात्र ऐन फॉर्ममध्ये असतानाच शॉला स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. आकाश चोप्रा () यानेही शॉच्या दुखापतीबाबत नाराजी व्यक्त केली.
“असे वाटत आहे की, पृथ्वी शॉ याने आपले नशीब बदलले आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी तो इंग्लंडमध्ये गेला होता आणि चांगले प्रदर्शन देखील करत होता. पहिल्या सामन्यात तो हिट विकेट जाला आणि यासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. त्यानंतर त्याने खूप धावा केल्या. त्याने चांगली फलंदाजी केली आणि आता त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. जेव्हा सर्वकाही ठीक सुरू होते आणि शॉ धावा करत होता, तेव्हाच त्याला ही दुखापत झाली आहे. आता तो पुन्हा घरी येईल, त्याचा दौरा संपला आहे. असे वाटते की, एनसीएमध्ये अजून एखा दुखापतग्रस्त खेळाडूची जागा बुक झाली आहे. अनेकदा नशिबाशी लढा सोपा नसतो.” (Akash Chopra reacts after in-form Prithvi Shaw gets injured)
महत्वाच्या बातम्या –
द्रविड आणि जय शहांमध्ये दोन तास चर्चा! बीसीसीआयचा आशिया कप आणि वर्ल्डकप मोड ऑन
विश्वचषकासाठी बॉटिंग ऑर्डर बदला! रोहित-विराटने ‘या’ क्रमांकावर खेळलं पाहिजे, शास्त्रींचा सल्ला