भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. येथील लहानग्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिपर्यंत सर्वांचा क्रिकेट हा आवडता खेळ असतो. केवळ क्रिकेट सामने पाहण्यापर्यंत त्यांचे वेड मर्यादित नसते, तर क्रिकेट खेळण्यातही भारतीयांना मोठा रस असतो. लहान मुले तर व्यवस्थित चालायला शिकायच्या आतच पालक त्यांच्यासाठी प्लॅस्टिकची बॅट-बॉल खेळायला घेऊन येतात. विषेश म्हणजे, चिमुकल्यांनाही त्या प्लॅस्टिकच्या बॅट-बॉलसोबत खेळायला खूप मजा येते.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी अशाच एका चिमुकल्याच्या क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्लॅस्टिकची बॅट घेऊन तो लहान मुलगा मोठ-मोठे शॉट लगावताना दिसत आहे. डाव्या हाताने नेत्रदिपक फटकेबाजी करणाऱ्या त्या लहान मुलाला पाहून चोप्राला ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरची आठवण झाली. त्यामुळे चोप्राने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “या लहान मुलामध्ये वॉर्नरची थोडीफार झलक आहे. तुम्हाला असे वाटते का?”
चोप्राच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काहींना त्या चिमुकल्या मुलामध्ये यष्टीरक्षक भारतीय फलंदाज रिषभ पंतची झलक दिसली. तर काहींना चोप्राप्रमाणे त्या मुलात वॉर्नरचीच झलक दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
There’s a little bit of @davidwarner31 in this kid. Agree? #AakashVani pic.twitter.com/6cXVvQRCoJ
— Aakash Chopra (@cricketaakash) December 24, 2020
Looks more like @RishabhPant17
— Saratchandra Abhishek (@SaratCuler) December 24, 2020
Sahi hai@davidwarner31 @VVSLaxman281
What about picking him up in sunrisers ❤️ 💜 ❤️— Mubeen M (@MubeenM15) December 24, 2020
…म्हणून चोप्राला त्या मुलात दिसली वॉर्नरची झलक
ऑस्ट्रेलियाचा ३४ वर्षीय क्रिकेटपटू डेविड वॉर्नर हा डावखुरा फलंदाज आहे. वॉर्नरला त्याच्या मोठ-मोठ्या शॉट लगावण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. कदाचित याच कारणामुळे त्या चिमुकल्यात चोप्राला वॉर्नरची झलक दिसली असावी.
दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही वॉर्नर बाहेर
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा तो भाग नव्हता. येत्या काही दिवसात भारत-ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीलाही तो मुकणार आहे. त्याला भारताविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना मांडीची दुखापत झाली होती. अजून तो त्या दुखापतीतून सावरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
अजिंक्य रहाणेला दिलासा; मेलबर्नमध्ये भारताचा शानदार रेकॉर्ड, पाहा आकडेवारी