विराट कोहली, जो रुट, स्टीव स्मित आणि केन विलियम्सन या चोघांना कसोटी क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ म्हटले जाते. पण भारतीय संघाच्या माजी दिग्गजाच्या मते आता हे ‘फॅब फोर’ नाही तर ‘फॅब थ्री’ झाले आहेत. कारण विराट कोहली त्याच्या नावाला साजेशी खेळी करत नाहीये. विराटवर निशाणा साधणारा हा दिग्गज दुसरी कोणी नाही, तर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा आहे. आकाशने यावेळी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर याच्या प्रदर्शनावरही नजर टाकली.
आकाश चोप्रा (Akash Chopra) आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘फॅब फोर’बाबत बोलत होता. त्याच्यामते विराट कोहली या यादीतून बाहेर पडला आहे. डेविड वॉर्नर देखील एकेकाळी फॅब फोरचा दावेदार होता. मात्र, ऑस्ट्रेलियन सलामीवीर देखील कसोटी क्रिकेटमध्ये सासत्याने अपयशी ठरत असल्यामुळे यादीतील चौथे स्थान रिक्त झाले आहे. आकाश चोप्रा आपल्या चॅनलवर म्हणाला की, विराट कोहली (Virat Kohli), स्टीव स्मिथ (Steve Smith), जो रुट (Joe Root) आणि केन विलियम्सन (Kane Williamson) एकेकाळी नक्कीच फॅब फोर होते. पण आता या यादीतून विराट कोहलीचे नाव कमी केले पाहिजे. कारण मागच्या मोठ्या काळापासून विराट धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे.
या व्हिडिओत आकाश चोप्रा म्हणाला, “विराट कोहली, जो रुट, स्टीव स्मिथ आणि केन विलियम्सन एकेकाळी नक्कीच फॅब फोर होते. खरंतर या यादीत डेविड वॉर्नरचं नावही सामील होतं. आपण कसोटी क्रिकेटची चर्चा करत आहोत. 2014 ते 2019 दरम्यानचा हा काळ आहे. पण आज आपल्याकडे ते फॅब फोर नाहीत, केवळ फॅब थ्री राहिले आहेत.” म्हणजेच आकाश चोप्राच्या मते विराटने विराटने 2019 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सुमार खेळी केली आहे.
“आपण जर 2014 ते 2019 दरम्यान विराटचे प्रदर्शन पाहिले, तर त्याने 62 सामन्यात 22 शतके केली होती आणि 58.71च्या सरासरीने 5695 धावा केल्या होत्या. विराटला अडवणे खूपच कठीण होते. देशांतर्गत क्रिकेटच्या एका हंगामात त्याने चार द्विशतके केली होती.” आकाशच्या मते डेविड वॉर्नरही त्यावेळी फॅब फोरच्या जवल होता. वॉर्नरने त्यादरम्यानच्या काळात 5196 धावा केल्या होत्या आणि त्याची सरासरी 50 धावांची होती. पण सध्या विराट आणि वॉर्नर दोघेही खराब फॉर्ममध्ये आहेत आणि फॅफ फोरची चौथा जागा रिक्त आहे, असे एकंदरीत आकाश चोप्राला सागायचे होते. (Akash Chopra’s big statement about the Fab Four)
महत्वाच्या बातम्या –
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा
धोनीला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण! थालाने ‘अशा’ पद्धतीने स्वीकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा