मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल क्वॉलिफायर दोनमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही. गुजरात टायटन्सने या सामन्यात मुंबई इंडियन्सला 62 धावांनी पराभूत केले. आकाशने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात पाच धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. एखाद्या अनकॅप्ड खेळाडूने केलेली ही आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी होती. पण हाच आकाश मधवाल एलिमिनेटर सामन्यात मुंबईसाठी महागात पडला.
लकनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आकाश मधवाल 3.3 षटकांमध्ये 5 धावा कर्च करून पाच विकेट्स घेऊ शकला होता. त्याच्या भेदक माऱ्यापुढे लखनऊ सुपर जायंट्सने अक्षरशः गुडघे टेकले होते. प्रेरक मांकड, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान यांच्या विकेट्स त्याने घेतल्या होत्या. असे असले तरी, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आकाशचा ‘हिरो ते झिरो’चा प्रवास चाहत्यांना पाहायला मिळाला. क्वॉलिफायर सामन्यात गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या शुबमन गिल याची विकेट आकाशने घेतली. पण सामन्यात मुंबईकडून तो दुसरा सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाजही ठरला. चार षटकात आकाशने 52 धावा खर्च करून एक विकेट घेतली.
आकाशच्या घातक गोलंदाजीमुळे एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा संपूर्ण संघ अवघ्या 16.3 षटकांमध्ये 101 धावा करू शकला. पण त्याला आपल्या प्रदर्शनात सातत्य टिकवून ठेवता आले नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आकाश मुंबईसाठी दुसरा सर्वात महागात पडलेला गोलंदाज ठरला. ख्रिस जॉर्डन याने गुजारात संघाला सर्वाधिक धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. जॉर्डनने आपल्या चार षटकांमध्ये तब्बल 56 धावा खर्च केल्या.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईला विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य मिळाले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा लयीत दिसत होते. मात्र त्यांनीही अनुक्रमे 61 आणि 43 धावा करून विकेट्स गमावल्या. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिलने अवघ्या 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी केली होती. (Akash Madhwal’s journey from ‘Hero to Zero’! The Gujarat Titans batsman scored a total of 52 runs off his bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेकर गिल! क्वालिफायर 2 मध्ये झंझावाती शतक ठोकत टाकले वीरू-वॉटसनला मागे
विराट आणि बटलरनंतर गिलनेच गाजवला आयपीएल हंगाम! खास यादीत मिळवले स्थान