पुणे, दि. १ जानेवारी २०२४ – बहुप्रतीक्षित अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या द पूना क्लब गोल्फ लीग-२०२४ स्पर्धेत आकाश नखरे(६३पॉईंट्स,मानव पारी पिन सीकर्स), आदित्य गर्ग(६०पॉईंट्स,केके कोठारी रॉयल्स), अविनाश देऊस्कर(५३पॉईंट्स,शुबान सनरायजर्स), जान्या बिष्णोई(४२पॉईंट्स,व्हॅस्कॉन द होली वन्स) हे महागडे खेळाडू ठरले आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पूना क्लब गोल्फ कोर्सवर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
या लिलाव प्रसंगी पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके, इक्रम खान (गोल्फ कॅप्टन), पीजीएल २०२४ स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष इंद्रनील मुजगुले, संयोजन समिती सदस्य आदित्य कानिटकर व सर्व सहभागी संघांचे संघमालक आपापल्या मार्की खेळाडूंसह उपस्थित होते. समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व आणि क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच सर्व संघांचे मालक यांची या प्रसंगी उपस्थिती होती. सर्वांनाच उत्सुकता असलेल्या या स्पर्धेच्या पाचव्या सत्राचा औपचारिक, पण तितकाच शानदार प्रारंभ या लिलावातून झाला.
पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके म्हणाले की, द पूना क्लब गोल्फ लीग – २०२४या स्पर्धेतून केवळ दर्जेदार गोल्फचेच दर्शन घडणार नसून खेळाडू, क्रीडारसिक आणि संघमालक यांच्यातील अनोख्या नात्याचे अनेक रंगही उलगडणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आगळ्यावेगळ्या पातळीवर जाणार आहे, यात शंका नाही.
सहभागी संघ व संघमालक यामध्ये सलील भार्गव (हीलियॉस ईगल्स), मनप्रीत उप्पल, अमित बोरा व गौरव गधोके (मनप्रीत अँड जीजी जाग्वार्स), अतिन आगरवाल (ऑटोमेक बेकर्स), सुनील गुट्टे (पिनाकी वॉरियर्स), वासुदेव राममूर्ती (व्हॅस्कॉन द होली वन्स), रूपेश बांठिया व रणजित दाते (मानव पारी पिन सीकर्स), अमित कोठारी (केके कोठारी रॉयल्स), अभिजीत गांगोली व विनय राठी (पोलो वेल्थ डिमांडफार्म अॅसेट एसर्स), अनिल अडवाणी (अडवाणी सुपर किंग्ज), विनोद कुमार (किर्लोस्कर लिमिटलेस रेंजर्स), राजीव संगतानी व ललित सोळंकी (मॅक्झिमम माव्हरिक्स), यशवंत झांजगे (शुबान सनरायजर्स), पद्मजा शिर्के व जय शिर्के (टीम शिर्के), विजय अडवाणी (विजय अडवाणी फेअरवे टायटन्स), सुनील दलाल (सॉफ्टसेल स्विंगर्स) आणि राकेश वाधवा (इव्हेन्ट डायनमिक्स पार-टी टायगर्स) यांचा समावेश आहे.
लिलावाच्या प्रसंगी क्रीडा क्षेत्रावर आधारित गीतांच्या तालावर (थीम सॉग्ज) नृत्यमालिकेतून (हाय परफॉर्मन्स डान्स) खऱ्या अर्थाने वातावरणात रंग भरला. पाठोपाठ व्यासपीठावर आलेल्या संघमालकांनी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाल्यचे जाहीर केले. रंगीबेरंगी फुगे हवेत सोडले गेल्यावर सर्वांनी सामूहिकरीत्या खिलाडू वृत्तीची शपथ घेतली.
या वेळी सर्व संघमालकांचा हार्दिक सत्कार करण्यात आला. लिलावासाठी एकूण ३१६ खेळाडू उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले. संघमालकांनी या खेळाडूंमधून गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ या तीन स्तरांवर आपल्याला हव्या त्य खेळाडूंची निवड करणे अपेक्षित होते. प्रत्येक संघाला त्यासाठी दोन कोटी रुपयांची मर्यादा होती व सर्वाधिक चुरस असलेल्या गोल्ड गटातून ९० खेळाडूंची निवड विविध संघांनी केली.
सर्व संघांनी मिळून एकूण २४० खेळाडूंची लिलावातून निवड केली. हे खेळाडू या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावतील, तसेच हे सर्व खेळाडू एकमेकांशी झुंज देताना स्पर्धा रंगतदार बनवितील, असा विश्वासही संघमालकांनी व्यक्त केला. (Akash Nakhre, Aditya Ghag, Avinash Deoskar, Janya Bishnoi became the most expensive players in The Poona Club Golf League)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर चांगलाच निराश झालेला विराट! मैदानातील व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितपेक्षा मोठ्या ‘सिस्कर किंगचा’ उदय! एकाच वर्षात मोडले सर्व विक्रम