नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात आजची तिसरी लढत झाली. नाशिक संघ सातव्या तर धुळे संघ आठव्या स्थानावर होता. नाशिक संघाकडून सुरुवातीला जोरदार खेळ केला. नंतर मात्र धुळे संघाने चांगला प्रतिकार केला. दोन्ही संघांनी एकमेकांना एक वेळ मध्यंतराच्या आधी ऑल आऊट केले.
नाशिक संघाकडून आकाश शिंदे नावाचा वादळ काही थांबायचं नाव घेत नव्हतं. मध्यंतरा पर्यत आकाश ने चढाईत 22 गुण मिळवले होते. त्यानंतर ही आक्रमक पवित्रा घेत सलग तीन सामन्यात 30 पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा रेकॉर्ड आकाश शिंदे ने केला. 3 सामन्यात 100 गुण मिळवत आकाश शिंदे ने आणखी एक विक्रम आपला नावे केला. तर एका सामन्यात सर्वाधिक 49 गुण मिळवण्याचा रेकॉर्ड आकाश शिंदे केला.
नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने 78-49 गुणांनी धुळे संघाचा पराभव केला. धुळे संघाने नाशिक संघाला चांगला प्रतिकार दिला. नाशिकच्या आकाश शिंदे ने 49 गुणांची वादळी खेळी केली तर गौरव सूर्यवंशी ने 4 पकडी केल्या. तर धुळ्या कडून मितेश कदम ने 16 तर विशाल शिंदे ने 11 गुण मिळवत सुपर टेन पूर्ण केला. (Akash Shindechi played well in Yuva Kabaddi series)
बेस्ट रेडर- आकाश शिंदे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
बेस्ट डिफेंडर्स- गौरव सूर्यवंशी, नाशिक द्वारका डिफेंडर्स
कबड्डी का कमाल- जयेश पाटील, नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
नांदेड चांबल चॅलेंजर्स, ठाणे हम्पी हिरोज संघाचा सलग चौथा चौकार