भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे झालेला दुसरा वनडे सामना (Second ODI) भारतीय संघाने ४४ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही खिशात घातली आहे. भारतीय संघाच्या या दणदणीत विजयाचा सूत्रधार ठरला तो, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna). या युवा गोलंदाजाने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि बलाढ्य वेस्ट इंडिजला केवळ १९३ धावांवरच रोखले. या सामन्यादरम्यान आपल्या भेदक गोलंदाजीबरोबरच आपल्या तिखट अंदाजांनीही (Prasidh Krishna & Akeal Hosein Banter) त्याने सामना दर्शकांचे लक्ष वेधले.
सोशल मीडियावर कृष्णाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो वेस्टइंडिजचा अष्टपैलू अकिल हुसैन याला डोळे वटारून पाहताना दिसतो आहे.
ही घटना वेस्ट इंडिजच्या डावातील ३४ व्या षटकात घडली आहे. कृष्णाच हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील एका चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या हुसैनने साधारण शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून मागेच क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहितच्या थोडे पुढे जाऊन पडला. कृष्णाच्या या भेदक चेंडूचे हुसैनकडे कसलेही उत्तर नव्हते. अगदी स्वत गोलंदाज कृष्णाही हा चेंडू फेकल्यानंतर त्याच्या डोळ्यांनी हुसैनला हेच सांगू इच्छित होता. यावेळी हुसैनही त्याच्याकडे एकटक पाहताना दिसला. त्यांच्यातील हा प्रंसग जवळपास ५ सेकंदांपर्यंत चालला.
— Bleh (@rishabh2209420) February 9, 2022
दरम्यान कृष्णाच्या या सामन्यातील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा हा वनडे कारकिर्दीतील केवळ सहावाच सामना होता. या सामन्यात त्याने ९ षटके गोलंदाजी करताना केवळ १२ धावा देत ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यानेच भारतीय संघाला या सामन्यातील पहिली विकेटही मिळवून दिली होती. त्याच्या या बहुमुल्य योगदानासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याबरोबरच ही कामगिरी करत तो सर्वात कमी धावा देत वनडेमध्ये ४ विकेट्स हॉल घेणारा केवळ तिसराच भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी केवळ भुवनेश्वर कुमार आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी हा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्यादा टेंशन नहीं लेने का! १८ धावांवर बाद होऊनही पंतभाऊ बिनधास्त बाउंड्रीवरच पडला आडवा- Photo
गुजरात जायंट्सचा तेलुगू टायटन्सला पराभवाचा धक्का, २ गुणांनी जिंकला सामना