येत्या आठवड्याभरात आशिया चषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत संघ निवडीवरून अनेकजण आपापली मते नोंदवत आहेत. अशावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकिब जावेद याने भारतीय संघनिवडीवर प्रस्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुख्य म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला संधी न दिल्याने अकिब नाराज झाला आहे.
“कोणत्याही फलंदाजाला ताशी १५० किलोमीटर वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करायचा नाही. उमरान मलिकला अधिक संधी देऊन विश्वचषकापूर्वी टीम इंडिया अधिक विकसित होऊ शकली असती. जेव्हा मी उमरानला पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहिलं तेव्हा मी खूप प्रभावित झालो. त्याने १५५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आणि योग्य भागात गोलंदाजी केली. अजून काय हवंय?” असा सवाल अकिब जावेद याने उपस्थित केला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची लॉटरी, जायबंदी वेगवान गोलंदाजाच्या जागी आशिया चषकासाठी निवड?
Asia Cup 2022 | ‘या’ पाच कर्णधारांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने, यादीत एका भारतीयाचाही समावेश