इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेट कर्णधार ऍलिस्टर कूक सध्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसत आहे. पहिल्या गटात एसेक्स संघाकडून हंगामातील पहिलाच सामना खेळताना त्याने शानदार शतकही झळकावले आहे. फलंदाजीत दम दाखवणाऱ्या कूकने यावेळी आपल्या गोलंदाजीतून सर्वांची वाहवा लुटली. त्याने नेमकं असं काय केलंय, ते आपण जाणून घेऊया.
झाले असे की, केंटविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऍलिस्टर कूकने (Alastair Cook) गोलंदाजी तर केलीच, मात्र यादरम्यान त्याने विचित्र प्रकारची ऍक्शन केली. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कूकने या सामन्यात केवळ एक षटक गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ८ धावा दिल्या. मात्र, या षटकात त्याने केलेली विचित्र रनअप गोलंदाजीने तो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. त्याची ही गोलंदाजीची विचित्र स्टाईल पाहून समालोचकही हैरान झाले.
Sir Alastair Cook, ever the entertainer 😂#LVCountyChamp pic.twitter.com/JRYCeI11oM
— Vitality County Championship (@CountyChamp) April 10, 2022
तत्पूर्वी फलंदाजी करताना सलामीवीर कूकने शानदार शतक साजरे केले. पहिल्या डावात त्याने १०० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या धावा करताना त्याने ११ चौकारही झळकावले होते. दुसऱ्या डावात तो अवघ्या २६ धावांवर नाबाद राहिला. कूकने पहिल्या विकेटसाठी निक ब्राऊनसोबत पहिल्या डावात २२० धावांची भलीमोठी भागीदारीही केली.
कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एक विकेट घेतली आहे. तसेच, चार वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही रामराम ठोकला आहे. मात्र, काऊंटी क्रिकेटमध्ये तो सातत्याने खेळताना आणि आपल्या फलंदाजीची कमाल दाखवताना दिसत आहे. यादरम्यान तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे.
एसेक्स आणि केंट संघात झालेला सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १२ गुण मिळाले. एसेक्स संघाचा पुढील सामना १४ एप्रिल रोजी लंकाशायर येथे समरसेटविरुद्ध होणार आहे.
कूकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १६१ कसोटी सामने खेळले असून यात ४५.३५च्या सरासरीने १२,४७२ धावा केल्या आहेत. यामध्ये ३३ शतके आणि ५७ अर्धशतकांसह १२,२५४ धावा केल्या आहेत. तसेच, वनडेमध्ये त्याने ९२ सामन्यात ३२०४ धावा केल्या आहेत. याबरोबरच तो ४ टी२० सामने खेळला असून त्यात त्याने ६१ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
अरेरे! हार्दिकने मोडला स्वत:चाच विक्रम, हैदराबादविरुद्ध ‘कासवा’सारखा खेळत नकोसा विक्रम नावावर
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video