इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ सध्या आघाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर तिसरा सामना यजमान इंग्लंडने जिंकला आहे. चौथा सामना बुधवारी (19 जुलै) मँचेस्टरमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक ऍलेक्स कॅरे याने जॉनी बेअरस्टोच्या विवादित विकेटविषयी प्रतिक्रिया दिली.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यंच्यातील दुसरी ऍशेस कसोटी यावर्षी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेलली गेली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात जॉनी बेअरस्ट (Jonny Bairstow) अगदी नायकीय पद्धथीने धावबाद झाला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेअरस्टोने चेंडू डेड समजून क्रीज सोडली. मात्र, यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याने संधी साधली आणि स्टंपिंग करून करून त्याला तंबूत धाडले. पंचांना कॅरेने फलंदाजाला बाद करण्याबाबत कुठलीच अडचण नव्हती. मात्र, इंग्लंड संघ आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड संताप पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर चौथ्या कसोटी सामन्याआधी आता ऍलेक्स कॅरे याची प्रतिक्रिया समोर येत आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1675473396585631744?s=20
ऍलेक्स कॅरे म्हणाला, “मी स्वतः काही वेळा अशा पद्धतीने बाद झालो आहे. तसेच याधीही मी फलंदाजांना अशा पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये माझा पहिला लीस्ट ए सामना खेळताना मी अशाच पद्धतीने बाद झालो होतो. त्यावेळी मी क्रीज सोडून पुढे गेलो होतो. मी निराश होतो पण त्यावेळी माझा कर्णधार जवळ येऊन म्हणाला, आता पुढच्या वेळी तू अशी चूक करणार नाही.”
दरम्यान, लॉर्ड्लवर इंग्लिश प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन संघाला चुकीची वागणूक दिल्याचेही पाहायला मिळाले. स्टॅन्डसमधून खेळाडूंना ट्रोल करण्यासाठी नारेबाजी केली जात होती. तर लॉर्ड्सच्या लॉन्ज रुममध्येही खेळाडूं आणि स्टेडियमच्या सदस्यांमध्ये वाद पेटला होता. याविषयीही कॅरे पुढे बोलला. “आम्हाला तत्काळ काही प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी याचा पूर्ण सन्मान करतो. तसेच खेळाडू वृत्तीविषयी देखील प्रत्येकजण आपले मत मांडू शकतो,” असे कॅरे पुढे म्हणाला. (Alex Carey reacts to the Jonny Bairstow run out controversy)
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियावर नामुष्की! प्रथमच बांगलादेशकडून स्वीकारावा लागला लाजिरवाणा पराभव
यश धूल आणि विराटमध्ये जबरदस्त बॉन्डिंग! स्वतः भारतीय कर्णधाराने केला खुलासा






