---Advertisement---

16 खेळ…113 भारतीय खेळाडू; 19 दिवस चालणार पॅरिस ऑलिम्पिकचा थरार! जाणून घ्या संपूर्ण यादी

On: मंगळवार, जुलै 16, 2024 4:43 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या खेळांमध्ये जगातील 10 हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्यासाठी संघर्ष करतील. भारताला नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत जरीन या जागतिक दर्जाच्या खेळाडूंकडून सुवर्ण पदकाची आशा आहे.

यावेळी भारतीय पथकात 113 खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकं जिंकली होती. चला तर मग, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सर्व 113 भारतीय खेळाडू कोणते, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 सहभागी भारतीय खेळाडूंची संपूर्ण यादी

तिरंदाजी – दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव, तरुणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत

ॲथलेटिक्स – नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबुबकर, मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अक्शदीप सिंह, विकास सिंह, परमजीत सिंह बिष्ट, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पारुल चौधरी, ज्योति याराजी, किरण पहल, तेजिंदरपाल सिंह तूर, आभा खटुआ, अनु रानी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रावेल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश, मिजो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूर्वम्मा, सुभा वेंकटेशन, प्राची, सुरज पवार, जेसविन एल्ड्रिन, किरण पाल

बॅडमिंटन – पीव्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रेड्डी, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रास्टो

बॉक्सिंग – अमित पंगल, निखत जरीन, लवलीना बोरगोहेन, जॅस्मिन लंबोडिया, प्रीति पवार, निशांत देव

घोडेस्वारी – अनुष अग्रवाल

गोल्फ – शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर

हॉकी – पीआर श्रीजेश, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय, राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुजरंत सिंग

शूटिंग मनु भाकर, ईशा सिंह, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर,  राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंह, अनंतजीत सिंह, रायजा ढिलोन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंह, अर्जुन बाबुता, एलानेविल वालारिवन, रमिता जिंदल, स्वप्निल कुसळे, सिफ्ट कौर सामरा, रिदम सांगवान, सरबजोत सिंह, अर्जुन सिंह चीमा

नौकानयन – विष्णु सरवणन, नेत्रा कुमानन

टेबल टेनिस – शरथ कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत

टेनिस – सुमित नागल, रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी

कुस्ती – विनेश फोगट, अंशू मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितिका हुडा, आनंद पंगल

वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू

पोहणे – धिनिधी देसिंगू, श्रीहरी नटराज

रोव्हिंग – बलराज पोविंग

ज्युडो – तुलिका मान

महत्त्वाच्या बातम्या – 

एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीचा डंका! पदकाचे प्रबळ दावेदार हे 6 कुस्तीपटू
सुट्टी संपली, कामावर या! टीम इंडियाचा नवा हेडमास्तर गंभीरचा विराट, रोहित अन् बुमराहला मॅसेज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---