बुधवारी (२१ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये दिवसातील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) असा होईल. केकेआरने आयपीएलच्या या हंगामाची सुरुवात विजयाने केली, तर चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर चेन्नई संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि सलग दोन सामने जिंकले. अशा परिस्थितीत धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईच्या संघाचे पारडे या सामन्यात जड दिसत आहे. तसेच, या सामन्यात खेळणारे अनेक बडे खेळाडू विक्रमांची रांग लावताना दिसतील.
धोनी, प्लेसिस आणि कार्तिक करू शकतात हे विक्रम
चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसने टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २२६ डावांमध्ये ५९९९ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला ६००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ १ धाव हवी आहे.
त्याचबरोबर दिनेश कार्तिक आज आपला २०० वा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कार्तिकशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने एमएस धोनी (२०७) आणि रोहित शर्मा (२०३) यांनी खेळले आहेत.
केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने टी२० क्रिकेटमध्ये २९५ डावांत ६९५० धावा केल्या आहेत, आज जर त्याने अर्धशतक ठोकले तर तो ७००० टी२० धावा करणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज बनेल.
रैना व कमिन्सची या विक्रमावर नजर
मिस्टर आयपीएल नावाने प्रसिद्ध असणारा चेन्नईचा प्रमुख फलंदाज सुरेश रैना यांनी आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९९ षटकार ठोकले आहेत. या सामन्यात एक षटकार ठोकताच तो षटकारांचे द्विशतक पूर्ण करेल. तसेच चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला ५० आयपीएल बळी पूर्ण करण्यासाठी देखील एकाच बळीची आवश्यकता आहे.
केकेआरचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आज आपल्या कारकिर्दीतील १०० वा टी२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्याने आत्तापर्यंत ९९ टी२० सामने खेळत ११३ बळी आपल्या नावे केले आहेत.
आजच्या सामन्यासाठी केकेआर आणि सीएसकेचे संभावित संघ
कोलकाता नाईट रायडर्स-
शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ऑएन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरीन, पॅट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा
चेन्नई सुपर किंग्स-
फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, सॅम करन, ड्वेन ब्रावो आणि दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
Video: लाईव्ह सामन्यात रिषभची सटकली; संघ सहकाऱ्याला म्हणाला, ‘शरीर मोकळं सोडून खेळ जरा’
“…म्हणून एमएस धोनी घेऊ शकतो थोडी विश्रांती”, माजी दिग्गजाचे मोठी प्रतिक्रिया
एकेकाळी महिलेला मारहण केल्याने झाला होता तुरुंगवास, आता आयपीएलमधील दमदार कामगिरीने लुटतोय वाहवा!