आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने गुरुवारी (25 जानेवारी) पॅट कमिन्स याला सन्मानित केले. कमिन्सच्या नेतृत्वात मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाने वनडे विश्वचषक आणि त्याआधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनलेला कमिन्ससाठी 2023 नेहमी लक्षात राहणार असेल. त्याने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्याच, पण त्याचसोबत ऍशेस मालिका देखील बरोबरीत सोडवली. आपण या लेखात 2004 साली सुरू झालेल्या आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी पाहणार आहोत.
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर
2023 – पॅट कमिन्स*
2022 – बाबर आझम
2021 – शाहीन आफ्रिदी
2020 – विराट कोहली (दशकातील सर्वोत्कृष्ट)
2019 – बेन स्टोक्स
2018 – विराट कोहली
2017 – विराट कोहली
2016 – रविचंद्रन अश्विन
2015 – स्टीव स्मिथ
2014 – मिचेल जॉन्सर
2013 – मायकल क्लार्क
2012 – कुमार संगकारा
2011 – जॉनथन ट्रॉट
2010 – सचिन तेंडुलकर
2009 – मिचेल जॉन्सर
2008 – शिवनारायण चंद्रपॉल
2007 – रिकी पाँटिंग
2006 – रिकी पाँटिंग
2005 – अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि जॅक कॅलिस
2004 – राहुल द्रविड
दरम्यान, गुरुवारी कॅट कमिन्ससह उस्मान ख्वाजा आणि विराट कोहली यांनाही महत्वाची पुरस्कार दिले गेले. उस्मान ख्वाज आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर ठरला, तर विराटला 2023 चा वनडे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार दिला गेला. सूर्यकुमार यादव बुधवारी (24 जानेवारी) आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर बनला होता. त्याचसोबत न्यूझीलंडचा युवा रचिन रविंद्र याला आयसीसी इमर्जिंक प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार दिला गेला.
महत्वाच्या बातम्या –
संपूर्ण यादी । विराट चौथ्यांदा ठरला ODI Cricketer Of The Year, याआदी हे भारतीय खेळाडूही ठरलेत मानकरी
नुसती यादी पाहून डोळे फिरतील! आयसीसीचे 10 ॲवॉर्ड्स मिळवणारा विराट जगात एकमेव