---Advertisement---

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: फायनलमधील पराभवानंतरही लक्ष्य सेनने जिंकली करोडो मने; मोदी, सचिनकडूनही कौतुक

On: सोमवार, मार्च 21, 2022 12:34 PM
Laksya-Sen
---Advertisement---

भारताचा युवा बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन चांगलाच चर्चेत आला आहे. बॅडमिंटन श्रेत्रात मानाची मानली जाणार ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहणाऱ्या लक्ष्य सेनला पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात जागतिक बॅडमिंटनमध्ये क्रमांक एकचा आणि ऑलिम्पिक चॅम्पियन विक्टर एक्सेलसेन याने लक्ष्यला मात दिली. लक्ष्यला मिळालेल्या या पराभवानंतर भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि पंतप्रधान नेरंद्र मोदींना खास ट्वीट करून त्याची पाठ थोपटली आहे.

लक्ष्य सेन  (Lakshya Sen)ऑल इंग्लंड चॅम्पियनशिर स्पर्धेदरम्यान जबरदस्त प्रदर्शन करत होता. त्याने स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनामुळे जाणकार आणि चाहते चकीत होते. अनुभवी खेळाडूंना मात देत लक्ष्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला, पण त्याला या महत्वाच्या सामन्यात पराभव पतत्करावा लागला आहे. अंतिम सामन्यात विक्टर एक्सेलसेनने १०-२१ आणि १५-२१ अशा फरकाने लक्ष्यला पराभूत केले. पराभवानंतर मात्र लक्ष्यसाठी भारतीय चाहते सहनभूती दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही लक्ष्यसाठी ट्वीट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून लक्ष्यचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, “लक्ष्य आम्हाला तुझ्यावर अभिमान आहे. तू धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. तू एक उत्साही लढाई लढली आहे. भविष्यासाठी तुला शुभेच्छा. मला पूर्ण विश्वास आहे की, तू यशाची नवीन उंची गाठशील.”

तसेच सचिन तेंडुलकरने ट्वीट करून लिहिले की, “आयुष्यात अपयश असे काहीच नसते. तुम्ही एक तर जिंकता किंवा शिकता. मला विश्वास आहे की, तू या अद्भुत अनुभवातून खूप काही शिकला असशील. पुढच्या स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा.”

दरम्यान, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप या मानाच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत फक्त दोन वेळा विजेतेपद मिळाले आहे. सन १९८० मध्ये प्रकाश पादुकोण यांनी या स्पर्धेत भारतासाठी पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००१ मध्ये पुलेला गोपीचंद यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. लक्ष्य सेनेकडे संधी होती की, तो या स्पर्धेच्या विजेतपदाचा २१ वर्षाचा दुष्काळ संपवू शकत होता, परंतु अंतिम सामन्यात त्याला मात मिळाली.

महत्वाच्या बातम्या –

आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ

आयपीएल सुरू होण्याच्या ६ दिवसांपूर्वीच चाहत्यांसाठी वाईट बातमी! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय?

इंग्लंडच्या फलंदाजीपुढं न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दैना, १ विकेटने मिळवला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---