---Advertisement---

लक्ष्य सेनचा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत सनसनाटी प्रवेश, जेतेपदापासून दोन पावले दूर

On: शनिवार, मार्च 7, 2026 9:02 AM
---Advertisement---

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशीपमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्याने पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (६ मार्च) बर्मिंघममध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली शी फेंगचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने उपांत्यपूर्व सामन्यात सुरूवातीपासूनच त्याची पकड कायम ठेवली होती. त्याने फेंगला २१-१३, २१-१६ असे पराभूत केले. ४५ मिनिटे चाललेल्या या सेट्समध्ये लक्ष्यने केवळ आक्रमक नाही तर त्याने त्याच्या डिफेंसने सर्वांना चकित केले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तो तिसऱ्यांदा पोहोचत आहे.

सुरूवातीपासूनच लक्ष्यने आक्रमक खेळ करत फेंगवर वर्चस्व ठेवले. त्याचे कोर्टवरील नियंत्रण आणि शॉट्स (स्मॅश) सर्वकाही उत्तम राहिले. लक्ष्यने पहिल्याच सेटमध्ये ९-४ अशी आघाडी घेतली होती. त्याने आघाडी शेवटपर्यंत कायम राखत पहिला सेट जिंकला. दुसरा सेट आव्हानात्मक राहिला. यामध्ये मोठ्या रॅली आणि फेंगचा अधिक प्रयत्न दिसला, मात्र लक्ष्य त्यावेळी नियंत्रणातच राहिला. त्याने महत्वाच्या टप्प्यांवर गुण मिळवले आणि दुसरा सेटही आपल्या नावे केला. एकंदर यावेळी कोर्टवर लक्ष्यचेच राज्य दिसले.

लक्ष्य आणि फेंग यांची या सामन्याआधीची समोरा-समोरील कामगिरी ७-७ अशी होती. आता या विजयानंतर लक्ष्यने फेंगविरुद्ध ८-७ अशी आघाडी घेतली आहे. उपांत्य फेरीत लक्ष्य कॅनडाच्या विक्टर लाइशी आज (७ मार्च) भिडणार आहे.

लक्ष्य २०२२च्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसनकडून त्याचा पराभव झाला आणि त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर तो २०२४च्या उपांत्य फेरीत पोहोचला आणि इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून पराभूत झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---