अ.भा.कबड्डी सामनाधिकारी प्रात्याक्षिक व खेळाडू गुणवत्ता चाचणी शिबीराचे ठिकाण बदलले असून ही चाचणी आता मुंबईत दादर ऐवजी घाटकोपरला होणार आहे.
अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या सहकार्याने दि. २६ ते २८फेब्रुवारी २०१८ या कालावधीत खेळाडू गुणवत्ता चाचपणी व सामनाधिकारी प्रात्याक्षिक चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक राज्य पोलीस क्रीडाधिकारी, महाराष्ट्र पोलीस क्रीडा संकुल, रेल्वे पोलीस मुख्यालय, रमाबाई कॉलनी जवळ, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे सकाळी ०८-०० ते दुपारी ०४-०० या वेळात ही चाचणी घेण्यात येईल.
खेळाडूंच्या चाचणीकरिता खालील गोष्टीची पूर्तता असणे आवश्यक आहे.
१)खेळाडूचे वय २२वर्षाच्या आत असावे. ( दि. ३१ डिसें. १९९६ ते ०१ फेब्रु. २००० याच्या आत जन्मतारीख असावी.)
२) ओळखी करिता शासनमान्य आधार कार्ड, पारपत्र किंवा निवडणूक ओळख पत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.
३)खेळाडूचे वजन ८५ किलोच्या आत असावे.
४)खेळाडू दर्जेदार असावा. त्याने महत्वाच्या स्पर्धेत खेळल्याचे प्रमाण पत्र सोबत आणावे.
५)खेळाडूने खेळाच्या गणवेशात वेळेच्या अगोदर एक तास हजर असावे.
शिवाय खेळाडूंची मादक पदार्थ सेवन चाचणी घेण्यात येईल.तसेच या चाचणीस उपस्थित रहाणाऱ्या खेळाडूने स्वतःचा खर्च स्वतःच करावयाचा आहे.चाचणीत सहभागी झाला म्हणजे निवड झाली असे खेळाडूने समजू नये.
सामनाधिकारी म्हणून प्रात्याक्षिक चाचणी करिता येणाऱ्या सामनाधिकाऱ्याचे वय ४०वर्ष किवा त्यापेक्षा कमी असावे. त्यांना खेळाच्या नियमाची उत्तम जाण व दांडगा अनुभव असणे गरजेचे आहे.
सामानाधिकाऱ्याकरिता काही महत्वपूर्ण सूचना.
१)सामानाधिकाऱ्यानी गणवेशात एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
२)चाचणीस उपस्थित रहाणाऱ्या सामानाधिकाऱ्याने स्वतःचा खर्च स्वतःच करावयाचा आहे.
३)चाचणीत सहभाग घेतला म्हणजे त्यांना सामनाधिकारी म्हणून नियुक्त केले असे नाही.