‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 2025चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 8 संघ खेळतील, जे 2023च्या वनडे विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या 8 स्थानांवर होते. ही स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार असून (9 मार्च) पर्यंत चालणार आहे. या कालावधीत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले, तर भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह एका गटात ठेवण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेल अंतर्गत भारतीय संघाचे सर्व सामने युएई मधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील, ही भारतीय संघासाठी खूप चांगली बातमी आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनेक आठवड्यांच्या चर्चेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली. मात्र, पुढील 3 वर्षांत भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानसाठी हायब्रीड मॉडेल लागू केले जाईल, अशी अटही त्यांनी घातली. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.
दुबईमध्ये सामना होणे ही भारतासाठी चांगली बातमी आहे, कारण भारताचा येथे कधीही वनडे सामन्यांमध्ये पराभव झाला नाही. आतापर्यंत या मैदानावर भारताने 6 सामने खेळले असून त्यापैकी 5 वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे. भारताने आपला पहिला सामना 2018 मध्ये दुबई स्टेडियममध्ये हाँगकाँगविरूद्ध खेळला होता. त्यानंतर दुबईच्या मैदानात भारताला एकही पराभव पत्करावा लागला नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही दोनदा पराभूत केले आहे. भारताने बांगलादेशला दोनदा आणि हाँगकाँगला एकदा पराभूत केले आहे. भारताचा अफगाणिस्तानविरूद्धचा सामना बरोबरीत सुटला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक-
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत – दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध द. आफ्रिका – कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत – दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका – रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड – लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लाहोर
1 मार्च – द. आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत – दुबई
4 मार्च – सेमीफायनल 1* – दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2* – लाहोर
9 मार्च – फायनल – लाहोर/दुबई
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेटपटू बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कधी मैदानात उतरणार? येथे होणार पाकिस्तानशी सामना; सर्वकाही जाणून घ्या
IND vs AUS; “रोहित शुबमनला बोलव…” सरावादरम्यान चाहत्याने केली कर्णधारालाच विनंती! व्हायरल VIDEO एकदा पाहाच