विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. पंड्याला बांगलादेशविरुद्ध झालेली दुखापत आता गंभीर रूप घेताना दिसत आहे. आधी असे वृत्त समोर आले होते की, पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि तो एका सामन्यानंतर संघाशी पुन्हा जोडला जाईल. मात्र, आता तो अनेक सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. असे वृत्त समोर येत आहे की, भारतीय संघ त्याच्या बदली खेळाडूचा विचार करत नाहीये आणि बाद फेरीत पंड्याच्या पुनरागमनाची वाट पाहील.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या घोट्यातील ग्रेड 1 लिगामेंट फाटली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडनंतर आता इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नितीन पटेल यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय पथक बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे त्याची देखरेख करत आहे. मात्र, ही दुखापत आधीच्या दुखापतीपेक्षा जास्त गंभीर वाटत आहे. असे वाटत आहे की, त्याला लिगामेंटमध्ये सामान्य दुखापत आहे, ज्यामुळे त्याला बरे होण्यासाठी साधारण कमीत कमी 2 आठवडे लागू शकतात. दुखापत ठीक होण्यापूर्वी एनसीए त्याला रिलीज करणार नाही. वैद्यकीय पथकाने संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे की, त्यांना आशा आहे की, पंड्या लवकरच मैदानावर पुनरागमन करेल.”
भारतीय संघ पंड्याच्या पुनरागमनासाठी घाई करत नाहीये. यावरून स्पष्ट आहे की, हार्दिक इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात उपलब्ध राहण्याची कोणतीही शक्यता नाहीये. भारतीय संघ बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) लखनऊला पोहोचला आहे. तसेच, गुरुवारी त्यांचे पहिले सराव सत्र असणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. यामध्येही पंड्याचे पुनरागमन होणे कठीण आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धही खेळण्याची शक्यता कमी आहे.
Hardik Pandya has ligament tear. He's doubtful for the next 3 matches in the World Cup. (TOI). pic.twitter.com/ndP89Iyqyh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
पंड्याची कामगिरी
हार्दिक पंड्या याने विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने फलंदाजी करताना नाबाद 11 धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने आतापर्यंत 5 विकेट्स घेतल्या आहेत. (all rounder hardik pandya has ligament tear know for how many weeks he may be out of action world cup 2023)
हेही वाचा-
शतकांचा वर्ल्डकप! पहिल्या 24 सामन्यातच ठोकली गेली ‘रेकॉर्डब्रेक’ शतके
ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँडचे लोटांगण! कांगारूचा 309 धावांनी दणदणीत विजय