---Advertisement---

‘टी20त ईशानला ड्रॉप करून पृथ्वी शॉला खेळवा’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय दिग्गजाने कारणही सांगितलं

On: शुक्रवार, फेब्रुवारी 3, 2023 5:02 PM
Ishan-Kishan-And-Prithvi-Shaw
---Advertisement---

नुकतीच भारत विरुद्ध न्यूजीलंड संघात 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत दोन्ही मालिका खिशात घातल्या. या मालिकेत भारतीय संघाचा युवा सलामीवीर ईशान किशन याला खास कामगिरी करता आली नाही. तो सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. अशात त्याच्याविषयी विश्वविजेत्या भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण याने मोठे भाष्य केले आहे.

काय म्हणाला इरफान पठाण?
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) याने टी20 संघातून ईशान किशन (Ishan Kishan) याला बाहेर काढण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला आहे की, ईशानला बाहेर काढून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला संधी दिली पाहिजे. टी20 क्रिकेटमध्ये अलीकडे ईशान किशनला खास कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे इरफानने त्याला संघातून बाहेर काढण्याबाबत वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत पृथ्वी शॉ भारतीय संघाचा भाग बनला होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ईशानने तिन्ही सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत सलामीला फलंदाजी केली होती. मात्र, त्याला यादरम्यान एकाही सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. यादरम्यान तो धावाही करू शकला नाही आणि स्ट्राईक रेटही तितका खास नव्हता. त्यामुळे त्याच्या टी20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

‘शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ यांची सलामी जोडी जबरदस्त ठरेल’
स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना इरफान पठाण याला विचारण्यात आले की, पृथ्वी शॉ याला संधी मिळाली पाहिजे होती का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “मला वाटते की, पृथ्वी शॉ याला संधी मिळाली पाहिजे होती. एवढंच काय तर तिसऱ्या सामन्यातही अनेकजण पृथ्वीला खेळवण्याबाबत बोलत होते. माझा असा विश्वास आहे की, जर पृथ्वीला खेळवले, तर त्याला सातत्याने संधी द्या. त्याला पूर्ण मालिकेत खेळवा. तुम्ही त्याला एकच सामना देऊ शकत नाहीत. विशेषत: जेव्हा मालिकेतील एक निर्णायक सामना असेल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ईशान किशन हा फक्त एक फलंदाज म्हणूनच नाही, तर यष्टीरक्षक म्हणूनही खेळत होता. मात्र, जेव्हाही पृथ्वी खेळेल, तेव्हा शुबमन गिल याच्यासोबत त्याची जोडी शानदार राहील. कारण, गिल एक संतुलित सलामीवीर आहे.”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांचाही भारतीय संघात समावेश आहे. अशात या कसोटीत तरी ईशान चांगली कामगिरी करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (all rounder irfan pathan backs prithvi shaw in place of ishan kishan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता ऑस्ट्रेलियाला कसली चिंता! भारतातूनच शोधून काढला ‘डुप्लीकेट’ अश्विन, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि पाकिस्तान संघ ‘या’ दिवशी येणार आमने-सामने, भारतीय क्रिकेटप्रेमींनी बातमी वाचलीच पाहिजे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---