---Advertisement---

पाकिस्तानला भेटला हार्दिक पंड्यापेक्षाही खतरनाक ऑलराऊंडर, टीम इंडियालाही दिलंय त्याने टेन्शन

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 4:04 PM
Mohammad-Nawaz
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाने विरोधी संघांना चेतावणी दिली आहे. शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) पार पडलेल्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवत ही मालिका खिशात घातली. पाकिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार अष्टपैलू मोहम्मद नवाझ ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावत न्यूझीलंड संघ (New Zealand) फलंदाजीला उतरला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावा चोपल्या. पाकिस्तानने 164 धावांचे हे आव्हान 19.3 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानीवर 168 धावा चोपत पूर्ण केल्या. अष्टपैलू मोहम्मद नवाझ (Mohammad Nawaz) याने यावेळी फलंदाजी करताना 22 चेंडूत सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

https://twitter.com/TheRealPCB/status/1580794998349393921

गोलंदाजीतही दाखवला दम
विशेष म्हणजे, अष्टपैलू नवाझने मागील एक महिन्यात अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली आहे. अशात टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत तो पाकिस्तान संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. अंतिम सामन्यात या फिरकीपटू गोलंदाजाने 4 षटके गोलंदाजी करताना 33 धावा देत एक विकेटही आपल्या नावावर केली. 28 वर्षीय नवाझने अंतिम सामन्यापूर्वी बांगलादेशविरुद्धही 45 धावा चोपत संघाला एक चेंडू शिल्लक ठेवून रोमांचक विजय मिळवून दिला होता. त्याने 20 चेंडूंचा सामना केला होता. यात त्याने 1 षटकार आणि 5 चौकारांचाही पाऊस पाडला होता. तसेच, त्याने गोलंदाजी करताना 3 षटकात 37 धावा देत 1 विकेट आपल्या नावावर केली होती.

https://twitter.com/TheRealPCB/status/1580798943142633472

आशिया चषकात भारताविरुद्ध विजय
टी20 आशिया चषकाच्या एका सामन्यात नवाझने 20 चेंडूत 42 धावा चोपत पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध रोमांचक विजय मिळवून दिला होता. पाकिस्तान संघाने 182 धावांचे आव्हान 19.5 षटकात गाठले होते. नवाझ याने या सामन्यातही गोलंदाजी करताना 4 षटकांमध्ये 25 धावा देत 1 विकेट घेतली होती. नवाजची टी20 क्रिकेटमधील कामगिरी पाहता, तो भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्यापेक्षाही पुढे असल्याचे दिसत असल्याचे बोलले जात आहे.

देशांतर्गत टी20 क्रिकेटमधील नवाझची कामगिरी
त्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये एकूण 196 सामने खेळताना 22.81च्या सरासरीने 2190 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 126 इतका आहे. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 7.47च्या सरासरीने 167 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 24 धावा देत 5 विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच, त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळताना 48 टी20 सामन्यात 354 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजी करताना त्याने 44 विकेट्सही घेतल्या आहेत.

टी20 विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. दोघांमध्ये 23 ऑक्टोबर रोजी टी20 विश्वचषकातील पहिला सामना पार पडणार आहे. मागील वर्षी ओमान आणि यूएई येथे झालेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची खतरनाक गोलंदाजी चर्चेत, न्यूझीलंड फलंदाजाच्या बॅटचे दोन तुकडे
काय भानगड! हरभजन सिंगच्या एकाच आवाजावर हादरलं पंजाब क्रिकेट असोसिएशन, अध्यक्षाने दिला राजीनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---