---Advertisement---

अष्टपैलू म्हणजे विजयाची गॅरंटी! लखनऊ आणि चेन्नईकडे भरमार, पण ‘या’ संघांकडे मर्यादित पर्याय

On: सोमवार, मार्च 21, 2022 1:18 PM
csk-21
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होणार आहे. चाहते आयपीएलची वाट पाहत आहेत. पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. यावर्षीच्या हंगामात दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे, तर आयपीएलचे स्वरुप सुद्धा बदलण्यात आले आहे. यातील चेन्नई आणि लखनऊ सूपर जायंट्स संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंची काही कमी नाही तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांकडे अष्टपैलू खेळाडूंची कमी आहे.

चेन्नई संघाकडे मोईन अली, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हे महान अष्टपैलू खेळाडू आहेत. तर लखनऊ संघाकडे मार्कस स्टॅायनिस, कृणाल पंड्या आणि दिपक हूड्डा आणि यांहून अधिक अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु गुजरात संघाकडे कर्णधार हार्दिक पंड्याशिवाय विजय शंकर आणि डोमिनिक ड्रेक्स हे दोन पर्याय आहेत. तसेच डोमिनिक ड्रेक्सला आयपीएलचा जास्त अनुभव नाही आणि हार्दिक त्याच्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर जास्त क्रिकेट खेळलेला नाही.

राजस्थान राॅयल्स संघाचे सुद्धा काही असेच आहे. या संघाकडे न्यूझीलंडचा डेरिल मिचेल हा अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच आर अश्विन आणि कुल्टर नाइल हे खेळाडू सुद्धा संघाचे भाग आहेत. परंतु हे खेळाडू फलंदाजीपेक्षा गोलंदाजी उत्तम प्रकारे करु शकतात.

तसेच दिल्ली कॅपिटल्सकडे अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, ललित यादव, मिचेल मार्श, मनदीप सिंह यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. मुंबई इंडियंसकडे कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, डेनियल सॅम्स, संजय यादव हे अष्टपैलू खेळाडू आहेत. लखनऊ सुपर जॉयंट्सकडे मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, जेसन होल्डर, कृणाल पंडया, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम, काइल मायर्स हे अष्टपैलू खेळाडू आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडे अष्टपैलू म्हणून ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, महिपाल लोमरोर, डेविड विली, सुयश प्रभुदेसाई हे खेळाडू आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाकडे मोईन अली, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सैंटनर हे अष्टपैलू आहेत. गुजरात टायटन्सकडे हार्दिक पंड्या, डोमिनिक ड्रेक्स, विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू आहेत.

कोलकाता नाइट राइडर्स संघाकडे व्यंकटेश अय्यर, मोहम्मद नबी, आंद्रे रसेल, शिवम मावी हे खेळाडू आहेत. पंजाब किंग्स संघाकडे ऋषि धवन, लियाम लिविंगस्टोन, बेनी होवेल, ओडियन स्मिथ हे अष्टपैलू आहेत. राजस्थान रॉयल्सकडे नाथन कुल्टर नाइल, डेरिल मिचेल, रविचंद्रन अश्विन तर सनराइजर्स हैदराबादकडे वॉशिंग्टन सुंदर, सीन एबॉट, अभिषेक शर्मा, श्रेयस गोपाल, मार्को यानसेन हे खेळाडू आहेत.

महत्त्त्वाच्या बातम्या-

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: फायनलमधील पराभवानंतरही लक्ष्य सेनने जिंकली करोडो मने; मोदी, सचिनकडूनही कौतुक

शुभमंगल सावधान! आयपीएल सुरू होण्यापूर्वी केकेआरचा दिग्गज अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल

आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---