आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये प्रेक्षकांना बुधवारी (११ फेब्रुवारी) पहिल्या सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सामन्यात जिंकला.अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केले.
या सामन्यात अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी १८८ धावा करायच्या होत्या, मात्र ते १८७ धावांवरच सर्वबाद झाले. तेवढ्याच धावा दक्षिण आफ्रिकेनेही केल्याने ग्रुप डी मधील हा सामना बरोबरीत राहिला होता. पहिल्या सुपर ओव्हरनंतरही त्याचा निकाल न लागल्याने सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.
ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने २३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने दुसऱ्याच चेंडूवर विकेट गमावली. नंतर चार चेंडूत चार षटकार असे समीकरण झाले. रहमानुल्लाह गुरबाजने केशव महाराजला लागोपाठ ३ षटकार मारत सामना अफगाणिस्तानच्या बाजूने केला. शेवटच्या चेंडूवर मारलेला शॉट सीमारेषेपार जाणार की असे वाटत असताना डेविड मिलरने तो झेल घेतला आणि दक्षिण आफ्रिका जिंकला.
टी२० विश्वचषक २०२४च्या उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या अफगाणिस्तानचा हा या आवृत्तीतील सलग दुसरा पराभव असल्याने त्यांच्या सुपर-८ च्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर आधीच्या आवृत्तीमध्येही ५ सामने बरोबरीत झाले असता त्यांचे निकाल सुपर ओव्हरमध्ये लागले, एकाचा मात्र बॉल-आऊटमध्ये लागला.
भारत विरुद्ध पाकिस्तान– दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या-वहिल्या टी२० विश्वचषकात ग्रुपमधील भारत-पाकिस्तान सामना बरोबरीत आला होता. दोन्ही संघानी समान १४१ धावा केल्याने सामन्याचा निकाल बॉल-आऊटमध्ये लागला. ज्यामध्ये भारत ३-० असा जिंकला. पुढे भारताने विश्वचषक जिंकला.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड – २०१२मध्ये पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये दोन सामने टाय झाले होते. त्यातील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड असा होता. दोन्ही संघांनी २० षटकात १७४ धावा केल्या होत्या. सुपर ओव्हरमध्ये सामना गेला आणि श्रीलंकेने उत्तम फलंदाजी, गोलंदाजी करत तो जिंकला. यामध्ये दोन्ही संघांनी एकही चेंडू सीमारेषेपार मारला नाही. त्या षटकात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १४ धावांची गरज असताना लसिथ मलिंगाने केवळ ७ धावा दिल्या.
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज – काही दिवसांनंतर पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सामना बरोबरीत आला. यावेळी ते वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले. दोन्ही संघानी १३९ धावा केल्या. सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेडूत वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी ५ धावांची आवश्यकता असताना टीम साऊथीच्या त्या चेंडूवर मार्लोन सॅम्युअल्सने षटकार मारत सामना जिंकला.
नामिबिया विरुद्ध ओमान – चाहत्यांना थेट १२ वर्षांनंतर टी२० विश्वचषकात सुपर ओव्हर पाहण्याची संधी मिळाली. २०२४च्या टी२० विश्वचषकात ब्रिजटाउनमध्ये खेळल्या गेलेल्या नामिबिया विरुद्ध ओमान सामन्यात दोन्ही संघांनी समान १०९ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये नामिबिया वरचढ ठरली. त्यांनी सामना ११ धावांनी जिंकला.
यूएसए विरुद्ध पाकिस्तान – त्याच विश्वचषकात एक चकित करणारा निकाल लागला. ग्रुप ए मधील यूएसए विरुद्ध पाकिस्तान समोरा-समोर आले. यामध्ये यूएसएने शेवटच्या षटकात १४ धावा केल्या आणि सामना बरोबरीत केला. दोन्ही संघानी १५९ धावा केल्याने निकाल सुपर ओव्हरमध्ये लागाला. यामध्ये यूएसएने १९ धावा केल्या. सौरभ नेत्रावळकरच्या उत्तम कामगिरीने यूएसएने पाकिस्तान १३ धावांवर एक विकेट घेत रोकले आणि टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील मोठा आणि आश्चर्यकारक विजय नोंदवला.
टी20 वर्ल्डकपमध्ये बरोबरीत (टाय) झालेले सामने
भारत वि. पाकिस्तान, डर्बन, 2007
श्रीलंका वि. न्यूझीलंड, पल्लेकेले, 2012
न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज, पल्लेकेले, 2012
नामिबिया वि. ओमान, ब्रिजटाउन, 2024
यूएसए वि पाकिस्तान, डॅलास, 2024
द.आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद, 2026*






