मंगळवारी(१० नोव्हेंबर) आयपीएल२०२० चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर अनेक खेळाडूंचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. त्यातीलच एक पुरस्कार म्हणजे ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा अर्थात सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा.
हा पुरस्कार देण्यासाठी बीसीसीआयचे काही नियम आहेत. हा पुरस्कार त्याच खेळाडूंना दिला जातो, ज्यांचा जन्म १ एप्रिल १९९४ नंतर झाला आहे. तसेच त्या खेळाडून ५ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामने किंवा २० किंवा त्यापेक्षा कमी वनडे सामने खेळलेले आहेत. तसेच त्या खेळाडूने २५ किंवा त्यापेक्षा कमी आयपीएल सामने खेळलेले असतील. तसेच त्या खेळाडूने आधी हा पुरस्कार मिळवलेला नसेल.
यंदाच्या हंदामात हा पुरस्कार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज देवदत्त पडीक्कलला मिळाला आहे. त्याने या हंगामात १५ सामन्यात ५ अर्धशतकांसह ४७३ धावा केल्या आहेत.
आत्तापर्यंतचे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणारे खेळाडू –
२००८ – श्रीवत्स गोस्वामी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२००९ – रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स)
२०१० – सौरभ तिवारी (मुंबई इंडियन्स)
२०११ – इक्बाल अब्दुल्ला (कोलकाता नाईट रायडर्स)
२०१२ – मनदीप सिंग (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१३ – संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
२०१४ – अक्षर पटेल (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१५ – श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१६ – मुस्तफिजूर रेहमान (सनरायझर्स हैदराबाद)
२०१७ – बासिल थंपी (गुजरात लायन्स)
२०१८ – रिषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१९ – शुबमन गिल (कोलकाता नाईट रायडर्स)
२०२० – देवदत्त पडीक्कल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)