---Advertisement---

उत्तर प्रदेशचा एक प्रतिभाशाली फिरकीपटू, मात्र ‘त्याला’ खेळायला मिळाला एकच कसोटी सामना

Gautam Gambhir, Nikhil Chopra and Harbhajan Singh
---Advertisement---

आजपर्यंत उत्तर प्रदेशच्या बऱ्याच क्रिकेटपटूंनी आपली छाप सोडली. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), सुरेश रैना असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी चांगलं प्रदर्शन करून आपली छाप सोडली. पण उत्तर प्रदेशच्या निखिल चोप्रा हे असे खेळाडू आहे, ज्यांना जास्त खेळण्याची संधी नाही मिळाली. त्यांना फक्त १ कसोटी सामना खेळता आला.

आज (२६ डिसेंबर) ४८ वा वाढदिवस साजरा करणार्या निखिल चोप्राची (Nikhil Chopra) गोलंदाजी बघण्यासारखी असायची. दुर्दैवाने त्यांना कसोटीमध्ये जास्त संधी मिळाली नाही. नाहीतर ऑफ स्पिनर म्हणून कसोटीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज झाले असते. ते योग्य लाईन आणि लेंग्थवर गोलंदाजी करायचे आणि त्यांचा चेंडू वेगाने यायचा.

निखिल चोप्रा यांनी देशांतर्गत स्पर्धेत उत्तर प्रदेश आणि दिल्लीचं प्रतिनिधित्त्व केलं. त्यांनी कारकिर्दीत एकच कसोटी सामना खेळला. २००० मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पदार्पण केलं. पण त्यांना पदार्पणात खास कामगिरी नाही करता आली. त्यांना २ डावांत फक्त ७ धावा करता आल्या आणि एकही विकेट नाही घेऊ शकले.

निखिल चोप्रा यांनी एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यांना फिरकीपटू असल्याने प्रथम प्राधान्य देण्यात आलं. त्यांनी ३९ एकदिवसीय सामने खेळून ४६ विकेट्स घेतल्या आहेत. एका अर्धशतकासह ३१० धावा केल्या.

निखिल चोप्राने एकदा ५ विकेट हॉल घेण्याचा सुद्धा पराक्रम केला आहे. टोरोंटोमध्ये वेस्टइंडीज विरुद्ध त्यांनी हा ५ विकेट हॉल घेतला. झिम्बाब्वे विरुद्ध १९९९ मध्ये त्यांनी एका सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. ते सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसोबतसुद्धा खेळले आहेत.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ६१ प्रथम श्रेणी सामने खेळले असून १५१ विकेट्स घेतल्या. तसेच १९४० धावा केल्या. याबरोबरच ८८ अ दर्जाचे सामने खेळले असून १०१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ७६० धावा केल्या आहेत.

ते सध्या समालोचक म्हणून काम करताना दिसतात.

महत्त्वाच्या बातम्या-

वनडेत कोहली, टी२०त आझम अन् कसोटीत रूट; धावांच्या ‘मोठ्या’ विक्रमांत हे कर्णधारच राहिलेत नंबर १

पहिले कसोटी शतक, पहिला विजय अन् बरचं काही; द. आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत द्रविडच्या खूप आठवणी

‘सिनीयर खेळाडूंना वगळले गेले, तरच त्यांना आपल्या स्थानाचे महत्त्व कळते’, द्रविड यांची रहाणेवर मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---