जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. कोची येथे होणाऱ्या या मिनी लिलावात 405 खेळाडूंचे नाव पुकारले जाईल. त्यामध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद घझनफार असेल. केवळ पंधरा वर्षांच्या असलेल्या अल्लाह याला आगामी गावात कोणता तरी संघ आपल्याला खरेदी करेल अशी आशा आहे.
आयपीएल लिलावाच्या अंतिम यादीत नाव सामील झाल्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“या अंतिम यादीत नाव आल्यानंतर मला मनापासून आनंद झाला. मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर मी मुख्य क्रिकेटकडे वळालो. वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द सुरू केलेली. मात्र, प्रशिक्षकांच्या सल्ल्याने मी फिरकीपटू बनलो.”
तो पुढे म्हणाला,
“मी कनिष्ठ स्तरावर बरेच क्रिकेट खेळलो आहे. माझे पुढील लक्ष अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल. आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास मला माझा खेळ सुधारण्याची आणखी संधी मिळेल. कारण ही जगातील सर्वात नामांकित स्पर्धा आहे. एक तरी संघ नक्कीच मला खरेदी करेल. या जगविख्यात स्पर्धेत खेळण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
अल्लाह मोहम्मद हा 15 वर्षांचा ऑफ स्पिनर आहे. 6 फुट 2 इंच अशी चांगली उंची लाभलेला अल्लाह सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत. मात्र, अफगाणिस्तानचा माजी कर्णधार दौलत ओमरझाई याच्या मार्गदर्शनानंतर त्याने फिरकीपटू होण्याचा निर्णय घेतला. अल्लाह अफगाणिस्तानचा प्रमुख असलेल्या मुजीब उर रहमान व भारताच्या रविचंद्रन अश्विन यांना आपले आदर्श मानतो. आयपीएल लिलावात त्याची आधारभूत किंमत 20 लाख इतकी असेल. यापूर्वी त्याने बिग बॉस लीग ड्राफ्टसाठी आपले नाव दिले होते. मात्र, त्याचा अंतिम यादीमध्ये समावेश झाला नव्हता.
(Allah Mohammad Believe He Will Sold In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकण्यापूर्वी अर्जुनला वडील सचिनने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणालेला, ‘जा आणि…’
अरे हा अमेरिकेचा की भारताचा संघ? यूएसएच्या अंडर 19 टीमवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया