भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने होणाऱ्या या मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. सध्या ही प्रतिष्ठेची ट्रॉफी भारतीय संघाकडे आहे. त्याचवेळी भारतात येऊन ही मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियन संघासमोर असेल. त्याचवेळी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व मालिकेला ज्यांचे नाव आहे त्या सर ऍलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलिया संघाला एक चॅलेंज दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला आपल्या मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी केली. असे असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची खरी परीक्षा भारतात होणार असल्याचे म्हणत आहेत. स्वतः सर ऍलन बॉर्डर यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“मी सुरुवातीला कमिन्सला कर्णधार बनवण्याच्या विरोधात होतो. कारण, मला भीती होती की तो गोलंदाजी वर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. मात्र, त्याने माझ्यासह अनेकांना खोटे ठरवले. त्याने आत्तापर्यंत उत्कृष्टरीत्या नेतृत्व केले आहे. मात्र, भारतात आता खरी परीक्षा होईल. भारतात ऑस्ट्रेलिया नेहमी जिंकत नाही. इथे ऑस्ट्रेलिया संघाला जिंकावे लागेल. त्यानंतर इंग्लंडमध्येही तशीच परिस्थिती असेल.”
सध्या ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. ते या स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याची शक्यता देखील सर्वाधिक आहे. मात्र भारताविरुद्धची मालिका त्यांना चांगली खेळावी लागेल.
या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर, तिसरा सामना 1 ते 5 मार्चला धरमशाला आणि चौथा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.
(Allen Border Gives Challenge To His Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच