भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी अफगानिस्तान संघाला दुलिप चषकात खेळण्याची बीसीसीआयने संधी द्यावी असे मत व्यक्त केले.
अफगानिस्तान संघाला गेल्या वर्षी कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्याचे आयोजन बीसीसीआयने 14 ते 18 जून या दरम्यान केले होते.
या सामन्यात कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बलाढ्य भारताने अफगानिस्तानचा दुसऱ्याच दिवशी पराभव केला.
याच पार्श्वभूमीवर कपिल देव मिड डे या वृत्तपत्राशी बोलत होते.
‘अफगानिस्तान संघाला दुलिप चषकात सहभागी व्हायची संधी मिळाली तर देशातील चांगल्या संघाशी त्यांना खेळण्याचा अनुभव मिळेल. त्यामधून अफगानिस्तानला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळेल.” असे कपिल देव म्हणाले.
“बीसीसीआयने वेळोवेळी अफगानिस्तान क्रिकेट संघाला मदत केली आहे. भारतातील क्रिकेटची मैदाने आणि इतर सुविधा बीसीसीआय अफगानिस्तानला पुरवली आहेत.” अफगानिस्तानच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट असल्याचे कपिल देव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात