रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022स्पर्धेच्या 16व्या सामन्यात पाकिस्तान संघाला चारी मुंड्या चीत करून टाकले. मेलबर्न येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4 विकेट्सने धूळ चारली. तसेच, विश्वचषकात विजयी सुरुवात केली. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने सामन्यातही अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या अफलातून कामगिरीबद्दल माध्यमांशी बोलताना त्याने मनमोकळेपणाने त्याच्या यशाबद्दल चर्चा केली.
मात्र, 29 वर्षीय हार्दिक पंड्या याला मागील काही वर्षांपूर्वी काहीच कल्पना नव्हती की, त्याचे भविष्य काय असेल. पण, एकदा त्याची अपयशाची भीती निघून गेल्यानंतर त्याला त्याचे हे रूप आवडू लागले. त्याने गोलंदाजीत फिटनेस मिळवण्यासाठी रिहॅबिलिटेशन केले. त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि आयपीएलमधील नवीन संघ गुजरात टायटन्सला आयपीएल 2021चे विजेतेपद जिंकून दिले. यानंतर आता त्याचा विश्वचषकातही तोच जलवा कायम आहे.
‘मी अपयशाची भीती काढून टाकली’
माध्यमांशी बोलताना त्याला प्रश्न करण्यात आला असता, तो म्हणाला की, “अशी एक वेळ होती, जेव्हा मला माहिती नव्हते की, हार्दिकसाठी पुढील गोष्ट काय आहे. त्यामुळे मला माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेत सामील व्हावे लागले आणि नंतर मी स्वत:ला विचारले की, तुला आयुष्याकडून काय हवंय?” पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी अपयशाची भीती काढून टाकली आणि पुढे काय होणार आहे किंवा निकाल काय असेल, याची चिंता नसते की, लोक काय म्हणतील, पण मी लोकांच्या मतांचा आदर करतो.”
Century Partnership! 👏 👏
A 1⃣0⃣0⃣-run stand between @imVkohli & @hardikpandya7! 🤝#TeamIndia move past 130 in the chase.
Follow the match ▶️ https://t.co/mc9usehEuY #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/suqxUvtyHN
— BCCI (@BCCI) October 23, 2022
हार्दिक पंड्याचे सामन्यातील प्रदर्शन
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचा जलवा दाखवला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतही आपले भरपूर योगदान दिले. त्याने आधी गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने फलंदाजीला उतरल्यानंतर 40 धावा चोपल्या आणि भारतीय संघाचा विजय सोपा केला. भारतीय संघाने एकेवेळी 31 धावांवर आपल्या 4 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, पंड्याने फलंदाजीला येत विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत 78 चेंडूत 113 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारतीय संघाने हा सामना 4 विकेट्सने आपल्या खिशात घातला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीला मागे टाकत एका अनोख्या रेकॉर्डचा रझा झाला ‘सिकंदर’
‘हा’ अजब नियम तुम्हाला माहिती होता का?, दक्षिण आफ्रिकी संघाला मिळाल्या फुकटच्या पाच धावा