---Advertisement---

इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकाच्या शर्यतीत राहुल द्रविडबरोबर ‘हे’ दिग्गजही! जाणून घ्या

On: सोमवार, जुलै 13, 2026 1:39 PM
---Advertisement---

कसोटीमधील वाईट कामगिरीमुळे ब्रेंडन मॅक्युलम यांना इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकमदावरून हटवले आहे. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली आहे. ही जागा घेण्याच्या शर्यतीत भारताच्या दिग्गजांचाही समावेश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड यांचा संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश आहे. त्यामध्ये इंग्लंडे माजी प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर आणि इंग्लंडचे माजी फिरकीपटू रिचर्ड डॉसन यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या यादीत श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा, इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक ऍंड्र्यू फ्लिंटॉफ, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांचाही समावेश आहे.

मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ असा पराभव झाल्यानंतर मॅक्युलमचा चार वर्षांच्या कसोटी प्रशिक्षक कार्यकाळ संपला.

पुढील वर्षी होणाऱ्या ऍशेस मालिकेआधी बदल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगून इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मॅक्युलमबाबतीत हा निर्णय घेतला. वनडे आणि टी २० संघांचे प्रशिक्षक म्हणून तो कायम असेल.

द्रविडची प्रशिक्षक म्हणून कामगिरी
द्रविड यांच्या प्रशिक्षणाच्या कार्यकाळात भारतीय पुरुष संघाने २०२४ चा टी २० विश्वचषक जिंकला. तसेच संघ २०२३ च्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. यामुळे ते इंग्लंडच्या कसोटी मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

द्रविडला पूर्णवेळ प्रशिक्षण देण्याची इच्छा नाही, मात्र इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदामुळे त्याला कुटुंबाला अधिक वेळ देता येईल.

बाकीचे उमेदवार
प्रशिक्षकपदाच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक झिम्बाब्वेचे माजी खेळाडू आणि इंग्लंडचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक फ्लॉवर याचांही समावेश आहे. त्यांनी संघाला तीन ऍशेस मालिका विजय मिळवून दिला. त्याच्याबरोबर संघ कसोटी क्रमवारीमध्येही अव्वलस्थानी आला होता.

फ्लॉवर यांनी लीग क्रिकेटमध्येही प्रशिक्षक म्हणून यश मिळवले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

तसेच डॉसन यांनी कांऊटी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चांगला अनुभव आहे. त्यांनी या दोन्हीमध्ये आपल्या प्रशिक्षण कौशल्याने प्रभावित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---