सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (south africa vs India) आहे. ३ सामन्यांची कसोटी मालिका झाल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बोलेंड पार्कमध्ये सुरू आहे. या सामन्यात खेळाडू नव्हे तर पंचांच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या यांच्यात बोलेंड पार्कमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात अंपायरींग करण्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच, मराईस इरासमस (Marais Erasmus) यांच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हा सामना पंच म्हणून त्यांचा १०० वा वनडे सामना आहे. असा कारनामा करणारे ते दक्षिण आफ्रिकेचे तिसरेच पंच ठरले आहेत. यापूर्वी फक्त रुडी कर्टजन आणि डेविड ओरचार्ड यांना असा कारनामा करता आला आहे.
रुडी कर्टजन यांनी १९९२ पासून ते २०१० पर्यंत २०९ वनडे सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा विक्रम केला होता. तर रुडी कर्टजन यांनी १९९४ पासून ते २००३ पर्यंत १०७ वनडे सामन्यांमध्ये अंपायरींग केली होती. तसेच मराईस इरासमस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते २००७ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अंपायरींग करत आहेत. त्यांनी १०० वनडे सामन्यांसह, ७० कसोटी सामने, ३५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने आणि १८ महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. (Marais Erasmus 100th odi match as umpire)
याबाबत बोलताना मराईस इरासमस यांनी म्हटले की, “मला अभिमान वाटतो की, मी इतक्या वर्षांपासून अंपायरींग करतोय. अशा खडतर परिस्थितीत जास्त काळ टिकून राहणे सोपे नाही, कारण आपण सर्व वेळ तपासणीत असतो, म्हणून मला हा पराक्रम गाठल्याचा अभिमान वाटतो.” तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० वनडे सामन्यात अंपायरिंग करणारे ते १८ वे पंच ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
वनडे मालिकेत टीम इंडियाला छळू शकतो पदार्पणवीर वेगवान गोलंदाज
लखनऊ फ्रेंचायझींंने दिला आश्चर्याचा धक्का! राहुलसह दोन अनपेक्षित नावांवर लागली मोहर
हे नक्की पाहा: