---Advertisement---

भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या एलिसा हेलीने केला मोठा पराक्रम

On: रविवार, मार्च 8, 2020 3:24 PM
---Advertisement---

आज (8मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेली (Alyssa Healy) हिने 15 धावा करताच आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील आपल्या 2000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

हेलीने भारतीय फिरकीपटू गोलंदाज दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात 3 चौकार ठोकत 13 धावा केल्या. तसेच, भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत चौकार ठोकत हेलीने 15हून अधिक धावा केल्या आणि तिच्या 2000 धावा पूर्ण केल्या.

अंतिम सामन्यापुर्वी हेलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1985 धावा होत्या. तिने आज अंतिम सामन्यात 39 चेंडूत 75 धावा केल्या. त्यामुळे आता तिच्या 112 सामन्यात 25.43 सरासरीने 2060 धावा झाल्या आहेत.

हेली ही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी ऑस्ट्रेलियाची दुसरीच महिला क्रिकेटपटू आहे. याआधी ऑस्ट्रेलियाकडून त्यांची कर्णधार मेग लेनिंगने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. तिने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 104 सामन्यात 2772 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---