---Advertisement---

१५ विश्वचषकात मिळून कुणालाही जमले नाही ते आज ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने करुन दाखवले

On: रविवार, मार्च 8, 2020 5:39 PM
---Advertisement---

आज (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना (Final Match) पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला.

यावेळी सलामीला फलंदाजी करणारी ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीने (Alyssa Healy) वेगवान सुरुवात केली. तिने दमदार फटकेबाजी करत अवघ्या 30 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केले आणि एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

यामुळे हेली आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. आजपर्यंत आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या कारकिर्दीत कुणीही इतके वेगवान अर्धशतक केलेले नाही. एवढेच नव्हे तर आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकातही कोणत्याच क्रिकेटपटूला अंतिम सामन्यात हेलीपेक्षा वेगवान अर्धशतक करता आले नाही.

या सामन्यात फलंदाजी करताना हेलीने 192.31च्या स्ट्राईक रेटने 39 चेंडूत 75 धावा केल्या. यात तिच्या 7 चौकारांचा आणि 5 षटकारांचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---