भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादेतील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम (Narendra Modi Stadium Ahmedabad) इथे पार पडला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात (११ फेब्रुवारी) भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा पर्याय स्विकारला. मात्र, फलंदाजीचा निर्णय घेणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही सदरचा निर्णय सार्थ ठरवण्यात अपयशी ठरल्याचे दिसले. (Rohit Sharma And Virat Kohli Out In Same Over Twice In ODI Series Against WI)
आश्वासक सुरुवात करणारा कर्णधार रोहित मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी…
रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन याच्यासह फलंदाजीसाठी मैदानावर पाऊल ठेवले आणि पहिल्याच चेंडूत खणखणीत चौकार ठोकत सर्वांना चकीत केले. सेहवागच्या स्टाईलने खेळाची सुरुवात करणारा रोहित मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच डावातील चौथ्याच षटकात रोहितने आपली विकेट दिली. (Alzarri Joseph gets Rohit Sharma)
वेस्ट इंडिजचा प्रमुख गोलंदाज अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) याच्या एका जादूई चेंडूवर रोहित त्रिफळाचित झाला. आणि अवघ्या १३(१५ चेंडू) धावा करत रोहित तंबूत परतला. रोहितच्या या १३ धावांत १२ धावा त्याने ३ चौकारासह केल्या होत्या हे विशेष.
हेही वाचा – तिसऱ्या वनडेत रोहितला पराक्रमाची संधी: अवघ्या १४ धावा करताच तोडणार गांगुली-तेंडुलकरचा मोठा विक्रम
विराट कोहलीची हारकिरी कायम…
रोहित शर्मा संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्यात अपयशी झाल्यानंतर मैदानावर भारतीय वनडे संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आगमन झाले. माागील अनेक वर्षांपासून सर्व क्रिकेटरसिकांना अपेक्षा असलेले विराटचे विक्रमी ७१ वे शतक साजरे करण्याची आणि संघाला सावरण्याची ‘हिच ती वेळ’ असतानाही विराटने सर्वांचीच घोर निराशा केली. आणि मागील अनेक सामन्यांतील कामगिरीप्रमाणेच तिसऱ्या वनडेतही विराटची हारकीरी कायम राहिली. यात महत्वाची बाब म्हणजे विराटने अवघ्या एका चेंडूच्या फरकाने आणि ‘शुन्य’ धावसंख्येवर आपली महत्वाची विकेट दिली. (Alzarri Joseph gets Virat Kohli)
Huge double blow for India!
Alzarri Joseph gets both Rohit Sharma and Virat Kohli in the same over 👊#INDvWI | 📝 https://t.co/Nj6NpGWSFV pic.twitter.com/Rjz51nOK3C
— ICC (@ICC) February 11, 2022
हेही वाचा – ‘रनमशीन’ कोहलीकडे तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाची सुवर्णसंधी; ऑस्ट्रेलियन दिग्गजाला टाकू शकतो मागे
विंडीजचा हुकमी एक्का अल्झारी जोसेफने बनवलं रोहित आणि विराटला आपलं गिऱ्हाईक...
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) या दोघांचीही विकेट घेणारा वेस्ट इंडिजचा प्रमुख गोलंदाज अल्झारी जोसेफ याने एक खास कामगिरी केली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत तिसऱ्या सामन्यासह जोसेफने तब्बल दोनदा रोहित आणि विराट आऊट केले. त्याने एकाच ओव्हरमध्ये दोघांनाही बाद करण्याची कामगिरी संपूर्ण मालिकेत दोनदा केलीये.
Alzarri Joseph gets Rohit Sharma and Virat Kohli in the same over twice in this ODI series.
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2022
एकप्रकारे भारताच्या दोन प्रमुख शिलेदारांना अल्झारी जोसेफने वनडे मालिकेत आपले फिक्स गिऱ्हाईक बनवल्याचे दिसून आले. (Alzarri Joseph gets Rohit Sharma and Virat Kohli in the same over twice in this ODI series)
अधिक वाचा –
INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर
आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर
भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश? जाणून घ्या सविस्तर