शनिवारी दुसपारी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना सामना झाला. बेंगलोरच्या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले. बेंगलोरसाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस वेगवान सुरूवात देऊ शकले, पण दोघांची भागीदारी मोठी होऊ शकली नाही. अमन खान याने जबरदस्त चपळाई दाखवत डू प्लेसिसचा झेल पकडला.
आरसीबीला फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याच्या रूपात पहिला झटका पावरप्लेमध्येच बसला. आरसीबीच्या डावातील पाचव्या षटकात मिचेल मार्श गोलंदाजीला आला होता. मार्शच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डू प्लेसिसने मीडविकेटवर एक जोरदार शॉट खेळला. पण चेंडू आपल्या जवळ अशल्याचे लक्षात येताच अमन खान (Aman Khan) याने धाडसाने हा झेल पकडला. हा झेल घेणाऱ्या अमन खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A Brilliant Catch! 👌
Aman Khan with a one-handed catch to dismiss the #RCB captain Faf du Plessis 👏👏
Mitchell Marsh with the breakthrough for @DelhiCapitals 💪#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/gvjgeY6eby
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर डेविड वॉर्नर () याने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 6बाद 174 धावा केल्या. सलामीला आलेल्या विराट कोहली याने 34 चेंडूत 50 धावा केल्या. तर डू प्लेसिसने 16 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. महिपाल लोमरूर याने 18 चेंडूत 26 धावा कुटल्या. ग्लेन मॅक्सवेल याने 14 चेंडूत 24 धावा केल्या. (Aman Khan took an amazing catch to send Faf du Plessis into the tent)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीप यादवपुढे मॅक्सवेल पुन्हा फेल! ऑस्ट्रेलियन अष्टपैलूची आकडेवारी निराशाजनक
IPL 2023 मध्ये विराटचा धुमाका सुरूच, चार पैकी तिसऱ्या सामन्यात ठोकले अर्धशतक