fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत सुवीर, वर्धन, आर्यन चौथ्या फेरीत दाखल

पीवायसी-हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजन

पुणे । सुवीर प्रधान, वर्धन डोंगरे, आर्यन खांडेकर यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या बॅटमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील तिसऱ्या फेरीत सहाव्या मानांकित सुवीर प्रधानने आर्यन पटवर्धनचा १५-५, १५-९ असा सहज पराभव केला.

चौथ्या फेरीत सुवीरची प्रथम वाणीविरुद्ध लढत होईल. प्रथम वाणीने आदित्य लोगनाथनवर १५-६, १५-६ अशी मात केली. चौथ्या मानांकित वर्धन डोंगरेने उशत जोशीवर १५-४, १५-३ असा, तर आर्यन खांडेकरने जय पिंपळेवर १५-८, १५-१० असा विजय मिळवला. आता चौथ्या फेरीत वर्धन-आर्यन यांच्यात लढत होईल.

अदिश, रूचिरचे विजय

या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील चौथ्या फेरीत आठव्या मानांकित अदीश देवस्थळेने ओम होजागेवर १५-५, १५-१० असा विजय मिळवला. यानंतर रूचिर प्रभुणेने श्रेयस सानेवर १४-१५, १५-१४, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. अग्रमानांकित प्रथम वाणीने देवेश गोएलवर १५-७, १५-१० अशी सहज मात केली.

निकाल : १७ वर्षांखालील मुले : तिसरी फेरी – प्रतिक धर्माधिकारी वि. वि. वेदांत गोखले १५-९, १५-१०; पार्थ जाटेगावकर पुढे चाल वि. नचिकेत दालवाले; वेंकटेश अगरवाल वि. वि. सौम्यरूप पोद्दार १५-९, १५-२; ओम दलभंजन वि. वि. सर्वेश हाउजी ६-१५, १५-१४, १५-११; लौकिक ताथेड वि. वि. अरिजित गुंड १५-७, १५-१०; पार्थ घुबे वि. वि. वरद सहस्त्रबुद्धे १५-५, १५-७; आर्यन शेट्टी वि. वि. अनय चौधरी १५-११, १५-१०; आयुष खांडेकर वि. वि. सार्थक ढोरे १५-५, १५-८; अदीश देवस्थळे वि. वि. निमीश बागमार १५-१२, १५-७; भूषण पोतनीस वि. वि. चैतन्य काळभैरव १५-५, १५-३.

पुरुष एकेरी : तिसरी फेरी – यश गिरे वि. वि. राजू ओव्हळ १५-१२, १५-१४; साहिल लोखंडे वि. वि. हर्ष गादिया १५-११, १५-११; सोहम कुलकर्णी वि. वि. कुणाल गोळे १३-१५, १५-११, १५-१०; विनीत कांबळे वि. वि. आशिष नेल्लुतला १५-१, १५-४; सतीश पाटील वि. वि. शुभम थोरवे १५-६, १०-१५, १५-९; वरद गजभिये वि. वि. रोहन पटवर्धन १५-१२, १५-१३; कुणाल वाघमारे वि. वि. सौरभ भुतकर १५-३, १५-११; अकेंद्र दरजी वि. वि. ओंकार केळकर १५-११, १५-११; वसीम शेख वि. वि. आशिष पंडित १५-९, ११-१५, १५-१३; मानसिंग नाईक वि. वि. प्रणव वाघ १४-१५, १५-८, १५-४; अभिषेक बोराटे वि. वि. नीरज गाडगीळ १५-११, १५-१०; अपूर्व जावडेकर १५-१२, १५-१०; जयराज वि. वि. कार्तिक चिंचोळीकर १५-१२, १५-७; प्रतीक धर्माधिकारी वि. वि. मयुर जगताप १५-९, १५-११; नरेंद्र पाटील वि. वि. सिद्धार्थ शिरोडकर १५-१०, १५-७.

११ वर्षांखालील मुली : चौथी फेरी – जुई जाधव वि. वि. श्रीया खराडे १५-३, १५-८; स्वामिनी तिकोणे वि. वि. पीयुषा फडके १५-४, १५-५; सुखदा लोकापुरे वि. वि. अंजली तोंडे १५-८, १५-६; जुई हळणकर वि. वि. ध्रिती जोशी १५-८, १३-१५, १५-११; इकिशा मेदाने वि. वि. आद्या जोशी १५-८, १५-१; अग्नी ठाकूर वि. वि. सई सागळे १५-८, १५-१२; युतिका चव्हाण वि. वि. सानवी सिन्हा १५-११, १५-१३; प्रांजळ सातपुते वि. वि. अद्विका जोशी १५-९, १५-८. मुले – सार्थक पाटणकर वि. वि. ओजस जोशी १५-११, १५-७; कोणार्क इंचेकर वि. वि. रुहान परब १५-८, १५-५; वरुण गंगवार वि. वि. इशान लागू १५-८, १५-९; सुदीप खोराटे वि. वि. श्रेयस लागू १५-१२, १५-११; अजिंक्य कुलकर्णी वि. वि. आदित्य पर्वती १५-६, १५-१०; केविन पटेल वि. वि. ओजस सोरटे १५-१०, १५-३; आर्यन बागल वि. वि. वरद वैद्य १५-५, १५-५.

१३ वर्षांखालील मुले : चौथी फेरी – जीत काकडे वि. वि. वरुण गंगवार ७-१५, १५-१३, १५-१३; क्रिश खातवड वि. वि. चैतन्य तिवारी १५-७, १५-५; ओम होजागे वि. वि. समर्थ साठे १५-१४, १५-१४; अर्जुन भगत वि. वि. ऋत्विक खेउर १५-११, १५-७; रजत कुलकर्णी वि. वि. कृष्णा जासुजा १५-७, १५-१४.

You might also like