---Advertisement---

हैदराबादचा डाव कोसळताच काव्या मारनचा संयम सुटला, कॅमेऱ्यात कैद झाला राग, VIDEO

On: सोमवार, एप्रिल 7, 2025 11:34 AM
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादने हंगामाची सुरुवात जोरदार केली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी 286 धावा केल्या आणि ईशान किशनने छान शतक झळकावलं. तेव्हा असं वाटत होतं की हा संघ यंदा 300 धावाही करू शकेल. पण त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

या हंगामात हैदराबादने सलग 4 सामने गमावले आहेत. या सामन्यांत त्यांची मोठी ताकद समजली जाणारी फलंदाजीच अपयशी ठरली आहे. ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, अभिषेक शर्मा यांसारखे मुख्य फलंदाज सातत्याने फेल झाले आहेत.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही असंच काहीसं घडलं. पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेड 8 धावांवर बाद झाला. पाचव्या षटकात अभिषेक शर्मा 18 धावा करून आउट झाला. ईशान किशनही केवळ 17 धावाच करू शकला. त्यामुळे संघाला फक्त 152 धावाच करता आल्या. या सामन्यात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात हैदराबादच्या संघमालकीण काव्या मारन खूप नाराज दिसली. प्रत्येक विकेटसह तिचा राग वाढताना दिसला. तिच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

गुजरातने हे लक्ष्य फक्त 17 व्या षटकात पूर्ण करत मोठा विजय मिळवला. आता गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आणि हैदराबाद 10व्या म्हणजे शेवटच्या स्थानी गेलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---