कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (केकेआर वि. सीएसके) यांच्या दरम्यान आयपीएल २०२१चा ३८ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकात सलामीवीर शुभमन गिल बाद झाला. त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत ९ धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याला अंबाती रायडूच्या अचूक ‘थ्रो’ने पव्हेलियनला धाडले.
शुभमन गिलने षटकातील शेवटचा चेंडू ऑफ साईडला मारला आणि तो लगेच एकेरी धावेसाठी धावला. नॉन-स्ट्रायकरच्या व्यंकटेश अय्यरने त्याला नाही असे म्हटले. याचदरम्यान, अंबाती रायडू धावत आला आणि त्याने चेंडू उचलत स्टंपचा अचूक वेध घेतला आणि गिल धावबाद झाला. गिल बाद झाल्यानंतर तो सलामी जोडीदारावर नाराज दिसला. कारण त्याने त्याच्या हाकेला योग्य प्रतिसाद दिला नव्हता. पण यात शुभमन गिलची चूक असल्याचे चाहत्यांनी तसेच निवेदकांनीही म्हटले आहे. कारण त्यावेळी धाव घेणे धोक्याचे असतांना गिलने धावांसाठी आग्रह धराला होता.
गिल बाद झाल्यानंतर सीएसकेचे खेळाडू जल्लोष करत अंबाती रायडूचे अभिनंदन करतांना दिसले. कारण पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळाली होती. अंबाती रायडूच्या या थ्रोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतांना दिसत आहे. मात्र ही विकेट गिलसाठी अतिशय दुर्देवी ठरली. कारण याच चेंडूआधी तो पायचित झाला होता. परंतु त्याने डीआरएस घेत स्वत:ची विकेट वाचवली होती.
— Cricsphere (@Cricsphere) September 26, 2021
तत्पूर्वी केकेआरने या सामन्यासाठी संघात काहीही बदल केलेला नाही. तर सीएसकेने ड्वेन ब्राव्होच्या जागी सॅम करनला संघात आणले आहे. धोनीने आपल्या खेळाडूंचा आणि विशेषतः ड्वेन ब्राव्होसारख्या महत्त्वाच्या खेळाडूचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
धोनी म्हणाला, ‘आजच्या सामन्यात आमच्या संघात एक बदल आहे, ब्राव्होच्या जागी सॅम करण खेळेल. सीपीएलमध्ये त्यास काही किरकोळ दुखापती झाल्या होत्या, त्या वाढू नये म्हणून आज त्यास आराम दिला आहे. संघासाठी सपोर्ट स्टाफ खूप महत्वाचा आहे. संघात अनुभवी खेळाडू असल्यास मदत होते.’
नाणेफेक जिंकल्यानंतर मॉर्गन म्हणाला, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, आमच्यात कोणतेही बदल नाहीत. हे एक वेगळ आव्हान असेल कारण हा एक दिवसाचा खेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खेळपट्टीवर अधिक वेग आहे. या प्रकारच्या उष्णतेमध्ये नंतर खेळपट्टी संथ होऊ शकते’
महत्त्वाच्या बातम्या-
मनात किती खोट म्हणावं!! लाईव्ह सामन्यात डगआऊटमधून कर्णधार मॉर्गनला प्रशिक्षकांच्या खाणाखुणा
CSKvsKKR, Live: शार्दुल-हेजलवुडचा भेदक मारा, त्रिपाठीच्या ४३ धावांमुळे केकेआरच्या ६ बाद १७१ धावा