भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) अलीकडेच 2024-25च्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळताना दिसला. या स्पर्धेत विराट रेल्वेविरूद्ध खेळला. दरम्यान या सामन्यात तो अपयशी ठरला. दिल्लीने हा सामना एक डाव आणि 19 धावांनी जिंकला. आता या सामन्यानंतर भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याबद्दल वक्तव्य केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून रायुडूने स्पष्टपणे सांगितले की, विराट कोहलीला रणजी ट्रॉफी खेळण्याची गरज नाही. याशिवाय, रायुडू म्हणाला की, कोहलीविरुद्ध कोणत्याही शक्तीचा वापर केला जाऊ शकत नाही. दरम्यान रायुडूने विराटच्या 81 आंतरराष्ट्रीय शतकांबद्दलही सांगितले.
रायुडूने इंस्टाग्रामवर लिहिले की, “विराट कोहलीला (Virat Kohli) सध्या रणजीची गरज नाही. त्याची शक्ती 81 शतकांसाठी चांगली होती आणि पुढेही चांगली राहिल. कोणीही त्याला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नये. त्याने खूप काळजी घेतली पाहिजे. यासाठी वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा. आतली ठिणगी आपोआपच पेटेल. मुळात, त्याचा आदर करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याला एकटे सोडा.”
विराट कोहलीने (Virat Kohli) 12 वर्षांहून अधिक काळानंतर रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) पुनरागमन केले आहे. कोहलीने यापूर्वी नोव्हेंबर 2012 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला होता. 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) अपयशी ठरल्यानंतर कोहली रणजीकडे वळला.
विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 5 कसोटी सामन्यांमध्ये 190 धावा केल्या, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश होता. कोहलीने मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते. यानंतर, उर्वरित 4 कसोटी सामन्यांमध्ये कोहली पूर्णपणे फ्लॉप झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का!
रणजी सामन्यात कोहलीचा बोल्ड काढणाऱ्या सांगवानची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
हर्षित राणाला खेळवल्यामुळे इंग्लंड खेळाडूंनी उठवले प्रश्न, भारताच्या प्रशिक्षकाचे रोखठोक उत्तर