भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात रायुडूने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रायुडूचा संग टेक्सस सुपर जायंट्सने याविषयी पुष्टी केली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगानात रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. अशात निवृत्तीनंतर तो विदेशी लीग खेळू शकत होता, पण त्याने अचानक आपला निर्णय बदलला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू विदेशी लीग खेळू शकतात. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) देखील निवृत्तीनंतर मेजर लीगच्या पहिल्या हंगामात खेळताना दिसेल, अशी अपेक्षा होती. पण त्याने या लीगमधूनही माघार घेतल्याचे समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्जे (Chennai Super Kings) फ्रँचायझीच्या मालकीचा टेक्सस सुपर किंग्ज (Texas Super Kings) संघासाठी रायुडू मेजर लीग (Major League 2023) खेळणार होता.
सीएशकेचा माजी खेळाडू ड्वेन ब्रावो देखील टेक्सस सुपर किंग्जसाठी मेजर लीग खेळणार आहे. संघात डेवॉन कॉनवे आणि मिचेल सॅटनर हे सीएशकेचे खेळाडू आहेत. सोबतच डेविड मिलरसारखा उत्तम फिनिशर देखील टेक्ससचे प्रतिनिधित्व करणार आहे. लीगमधील पहिला सामना टेक्सस संघाला लॉस ऍन्जलिस नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळायचा आहे.
दरम्यान, रायुडू जर टेक्सस संघासाठी खेळला असता, तर त्याने महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता. आयपीएल 2023मध्ये त्याने सीएसकेसाठी काही सामन्यांमध्ये महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच यावर्षी तो तब्बल हव्या वेळी आयपीएल ट्रॉफी उंचावू शकता. याआदीत 2013, 2015 आणि 2017 आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना, तर 2018, 2021 आणि 2023 हंगामात सीएसकेकडून खेळताना रायुडून आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.
टेक्सस सुपर किंग्ज संघ –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), डेवॉन कॉनवे, मिशेल सँटनर, अंबाती रायुडू, डेविड मिलर, गेराल्ड कोएत्जी, ड्वेन ब्रावो, डेनियम सॅम्स, रस्टी थेरॉन, केल्विन सॅवेज, लाहिलु मिलंथा, मिलिंद कुमार, सामी असलम, कॅमरून स्टीवेन्सन, कोटी चेट्टी, जिया शहजाद, सॅतेजा मुक्कमल्ला.
महत्वाच्या बातम्या –
‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट
WI vs IND । पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडीजचा 13 सदस्यीय संघ घोषित! स्टार खेळाडू संघातून बाहेर