पुणे -शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणाऱ्या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेशी संलग्न सोळा संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा उद्यापासून सुरु होणार आहे.
पूणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने माया सेवा संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ४ मार्चरोजी खेळविला जाईल.
स्पर्धेत अव्वल श्रेणीतील ५ आणि प्रथम, तसेच द्वितीय श्रेणीतील प्रत्येकी तीन आणि तृतीय श्रेणीतील ५ संगांचा समावेश असेल. स्पर्धेत एकूण ३५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जामार आहेत. विजेता संघ रोख २० हजार, तर उप विजेत्यासाठी १० आणि तिसऱ्या स्थानावरील संघासाठी ५ हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे.
सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ, सर्वोत्कृष्ट बचावपटू, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशा वैयक्तिक पारितोषिकासाठी रोख एक हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे.
मंगळवारचे सामने
संगम वायबी वि. डायनामाईटस सकाळी ११ वा.
कमांडो ए वि. व्हीएबीसी एफसी दु. १२.३०
दुर्गा एसए वि. नायफा दु. २ वा.
सनी डेड वि. आर्यन्स दु. ३.३० वा.
(Amdar Trophy Football 16 Teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
मितालीसह लग्नाच्या बेडीत अडकला शार्दुल! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ‘लॉर्ड’चा विवाहसोहळा