Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल

February 28, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Vinod-Shivpuram

Photo Courtesy: Twitter/Haritjoshi


सभ्य लोकांचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखले जाते. या खेळात जेवढे महत्त्व खेळाडूंच्या कामगिरीला असते, तितकेच महत्त्व त्यांच्या सुरक्षेलाही असते. सुरक्षेसाठी खेळाडू हेल्मेट आणि पॅडसह अनेक गोष्टी वापरतात. मात्र, जसा गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला चेंडू लागण्याचा धोका असतोच तसाच किंवा त्यापेक्षा अधिक धोका हा पंचांनाही असतो. कारण, अनेकदा मैदानावर पंचांना चेंडू लागता लागता वाचला आहे, तर काही वेळा चेंडूमुळे त्यांना दुखापतही झाली आहे. असेच काहीसे आता पुन्हा एकदा घडले आहे. मुंबईत खेळलेल्या गेलेल्या एका क्लब सामन्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पंचाच्या डोक्याला चेंडू लागला असल्याचे दिसत आहे.

यष्टीच्या मागे थांबून खेळाडू बाद आहे की नाबाद, हा निर्णय देणारे पंच अनेकदा दुखापतग्रस्त होत असतात. असेच काहीसे आता मुंबईतील एका क्लब सामन्यात बीसीसीआयच्या पंचांसोबत घडले. चेंडू लागल्यानंतर पंच थेट मैदानावर कोसळले.

बीसीसीआयचे पंच विनोद शिव पुरम (Vinod Shivpuram) हे जिमखाना क्लबमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान पंचाची भूमिका पार पाडत होते. यादरम्यान फलंदाज शम्स मुलानी (Shams Mulani) याने जोरदार फटका मारला. त्याने मारलेला चेंडू थेट पंचांना जाऊन लागला. चेंडूचा वेग इतका जोरात होता की, विनोद चेंडूपासून स्वत:ला दूर करूच शकले नाहीत. तो चेंडू थेट त्यांच्या मानेवर जाऊन लागला आणि ते मैदानावरच पडले.

Scary, very scary!
This happened in a local club match in Mumbai. BCCI umpire Vinod Shivpuram got smacked on the head after a blinder of a shot from Shams Mulani. It is understood that Parsee Gymkhana's ace physio Dr Saloni did a fab job. MRI scan is clear. pic.twitter.com/tzkm7jJ5vZ

— Harit Joshi (@Haritjoshi) February 26, 2023

विनोद हे बीसीसीआयच्या क्लब सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावतात. आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात दिसते की, कशाप्रकारे चेंडू लागल्यामुळे ते जमिनीवर पडून वेदनेने विव्हळत आहेत. ही घटना घडताच, क्षणाचाही विलंब न करता संघाचे फिजिओ डॉक्टर सलोनी तिथे पोहोचले. तसेच, त्यांनी प्रथमोपचार दिला. त्यावेळी त्यांना थोडंसं बरंही वाटलं. चांगली बाब अशी की, पंच विनोद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांना बरे वाटत होते. त्यांचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले आहे, त्यात काहीही धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे.

अशाप्रकारच्या घटना मैदानावर अनेकदा घडताना दिसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंचांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या हातात चेंडूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आर्मगार्डही दिले जाते. (bcci umpire vinod shivpuram smacked on head shot from shams mulani see Video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या यशाचे गमक आहे ‘सपोर्ट स्टाफ’! स्वतः खेळाडूंनी केला ‘तो’ खुलासा
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा बीसीसीआयवर आरोप, म्हणाला, “तुम्ही तुमच्या फायद्याच्या खेळपट्ट्या बनवतात”


Next Post
NZ-vs-ENG

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने हाणून पाडला बलाढ्य इंग्लंडचा डाव, कीवींच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी

New-Zealand-Celebration

सुवर्णक्षण! गेल्या 22 वर्षात क्रिकेटमध्ये कधीही न पाहिलेला क्षण, पाहा व्हिडिओ

New-Zealand-Cricket-Team

फॉलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143