इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. आयपीएल 2023 मधील उद्घाटनाचा सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान 31 मार्च रोजी खेळला जाईल. त्याचवेळी स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन संघाचे देखील संपूर्ण वेळापत्रक समोर आले. मुंबई यावर्षी आपले सहावे आयपीएल विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.
Mumbai Indians matches in IPL 2023. pic.twitter.com/1TmzVFrlJD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 17, 2023
रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स मागील दोन वर्षांपासून प्ले ऑफमध्येही प्रवेश करू शकला नाही. मुंबईने आतापर्यंत 2013, 2015, 2017, 2019 व 2020 असे पाच वर्ष आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यंदा ते विजेतेपद पटकावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील.
मुंबई आपल्या हंगामातची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध 2 एप्रिल रोजी बेंगलोर येथे करेल. ते घरच्या मैदानावर आपला पहिला सामना 8 एप्रिल रोजी कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळतील. चौदा पैकी सात सामने मुंबई येथील घरच्या वानखेडे स्टेडियमवर खेळतील. 21 मे रोजी मुंबई हैदराबाद विरुद्ध घरच्या मैदानावर आपला अखेरचा सामना खेळेल.
आयपीएल 2023
मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक
02 एप्रिल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (अवे), 08 एप्रिल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (होम), 11 एप्रिल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (अवे), 16 एप्रिल विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स(होम), 18 एप्रिल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (अवे), 22 एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्ज (होम), 25 एप्रिल विरुद्ध गुजरात टायटन्स (अवे), 30 एप्रिल विरुद्ध राजस्थान रॉयल्स (होम), 03 मे विरुद्ध पंजाब किंग्ज (अवे), 06 मे विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (अवे), 09 मे विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (होम), 12 मे विरुद्ध गुजरात टायटन्स (होम), 16 मे विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (अवे), 21 मे विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (होम).
मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, टिम डेव्हिड, मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल. कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, पियुष चावला, दुआन जॅन्सेन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.
(Mumbai Indians Full Fixtures For IPL 2023 Rohit Aiming 6th Title)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना