जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने ज्या टी20 लीगची वाट पाहत आहेत, ती लीग इतर कोणती नसून इंडियन प्रीमिअर लीग आहे. आयपीएल 2023चा घाट लवकरच घातला जाणार आहे. मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, सर्व संघ खेळाडूंसोबत तयार आहेत. मात्र, सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात मोठी चिंता एक नवीन कर्णधार शोधण्याची असेल. असे म्हटले जात आहे की, पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयंक अगरवाल याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. तसेच, भुवनेश्वर कुमार हादेखील या यादीत सामील आहे. मात्र, भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला आशा आहे की, ही जागा इतर खेळाडू घेऊ शकतो.
आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “एडेन मार्करम याने हे सिद्ध केले आहे की, तो एक स्टार खेळाडू का आहे. त्याचा हंगाम शानदार राहिला होता. त्यामुळेच सनरायझर्सने त्याला रिटेन केले आहे. मी संकोच न करता म्हणू शकतो की, एडेन मार्करम सनरायझर्स हैदराबादचा पुढील कर्णधार होऊ शकतो. त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिका टी20 लीग खूपच शानदार ठरली होती. त्याने खूप धावा काढण्यासोबतच विकेट्सही चटकावल्या होत्या.”
आयपीएल 2023ला ‘या’ तारखेपासून सुरुवात
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात 31 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडेल. याची माहिती आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
That's how excited we are! 🫂
🚁 Liftoff – March 3️⃣1️⃣#TATAIPL #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/Vf7yfQkA7b— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 17, 2023
Full schedule of IPL 2023. pic.twitter.com/9WdSMFejBG
— Johns. (@CricCrazyJohns) February 17, 2023
लिलावानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ-
हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, मयंक अगरवाल, हेन्रीच क्लासेन, एडेन मार्करम, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नीतिश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, समर्थ व्यास, सनवीर सिंग, मयंक डागर, विवरांत शर्मा, अब्दुल समद, मार्को यान्सेन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील हुसेन, आदिल रशीद आणि मयंक मार्कंडे. (ipl 2023 ravichandran ashwin tells aiden markram will be the captain of srh read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन