भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाच्या पारड्यात पडली. यावेळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे.
भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासाठी हा महत्त्वाचा सामना आहे. पुजारा त्याचा 100वा कसोटी सामना खेळतोय. या सामन्यासाठी भारतीय संघात फक्त एक बदल आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या जागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला ताफ्यात घेतले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1626425115306242048
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू कॅमरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क दिल्ली कसोटी सामन्यात खेळत नाहीयेत. त्यांच्या जागी ट्रॅव्हिस हेड आणि मॅट रेनशॉ यांना जागा मिळाली आहे. तसेच, मॅथ्यू कुह्नेमन याने पदार्पण केले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया-
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लायन, मॅथ्यू कुह्नेमन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच
केवळ ४० मिनिटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते ‘हे’ विश्वविक्रम






