Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ ४० मिनीटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते ‘हे’ विश्वविक्रम

केवळ ४० मिनीटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते 'हे' विश्वविक्रम

January 18, 2022
in टॉप बातम्या, क्रिकेट
AB-de-Villiers

Photo Courtesy: Twitter/ICC


दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहे. त्याला त्याच्याकडे असलेल्या चौफेर फलंदाजी करण्याच्या असलेल्या क्षमतेमुळे ‘मिस्टर ३६०’ असे नावही मिळाले. याच त्याच्या चौफेर फटकेबाजीचे सर्वात मोठे उदाहरण पाहायला मिळाले होते, ते ७ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना.

सात वर्षांपूर्वी म्हणजेच १८ जानेवारी २०१५ रोजी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान (जलद किंवा कमी चेंडूत) शतक करण्याचा कारनामा दक्षिण आफ्रिकेचा तत्कालिन कर्णधार व माजी फलंदाज एबी डिविलियर्सने केला होता.

त्याने जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात ४४ चेंडूत ५९ मिनीटं फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. जवळपास १ तासांत त्याने दिडशतक केले होते. परंतु, याच सामन्यात त्याने शतक पूर्ण करताना केवळ ३१ चेंडूचा सामना केला होता. त्याने २०१४मध्ये कोरी अँडसरन या खेळाडूने वनडेत ३६ चेंडूत केलेल्या जलद शतकाचा विक्रम मोडला होता.

#OnThisDay in 2015, AB de Villiers smashed the fastest ODI hundred off just 31 balls!

He went on to score a 44-ball 149, which featured nine fours and 16 sixes 🙌 pic.twitter.com/IFBVmRcRzP

— ICC (@ICC) January 18, 2020

केले होते केवळ ४० मिनीटांत शतक
डिविलियर्स या सामन्यात नाणेफेकमध्ये पराभूत झाला होता. यामुळे वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम आमला व रिली रुसो या दोघांनीही शतकी खेळी केल्या. ३९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रुसो बाद झाला व मैदानात आला एबी डिविलियर्स.

त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पुढे ५९ मिनीटं अगदी सळो की पळो करुन सोडलं. हशिम आमलाला १५३ धावांवर पोहचेपर्यंत डिविलियर्स १४९ धावा करुन तंबूत परतला होता. त्याने ३१ चेंडूत जलद शतकी खेळी करताना केवळ ४० मिनीटं घेतली होती.

या तिनही खेळाडूंच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने २ बाद ४३९ धावा केल्या. पुढे हा सामना तब्बल १४८ धावांनी दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.

अधिक वाचा – निवृत्तीनंतर एबी डिविलियर्सचा भावुक संदेश; म्हणतोय, ‘मी अर्धा भारतीय बनलोय आणि मला याचा अभिमान आहे’

जलद शतक व अर्धशतक
डिविलियर्सने या सामन्यात वनडेतील सर्वात जलद अर्धशतक (१६ चेंडू), वनडेतील जलद शतक (३१ चेंडू) व वनडेतील जलद शतक (४० मिनीटं) हे आपल्या नावावर केले होते. जलद अर्धशतकी खेळी करताना डिविलियर्सने १९९६मध्ये सनथ जयसुर्याने केलेला १७ चेंडूत अर्धशतकी खेळीचा विक्रमही या सामन्यात मोडला होता. हे अर्धशतक त्याने केवळ १९ मिनीटांत केले होते.

याच सामन्यात १६ षटकार मारण्याचा पराक्रम डिविलियर्सने केला होता. हा देखील त्यावेळी वनडे सामन्यातील एखाद्या खेळाडूने केलेला विक्रम होता. पुढे हा विक्रम ओएन माॅर्गन (१७ षटकार) या खेळाडूने मोडला.

व्हिडिओ पाहा –  १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?

तिसाव्या षटकानंतर फलंदाजीला येत केला होता कारनामा
तिसाव्या षटकानंतर फलंदाजीला येत शतक करणारा डिविलियर्स हा जगातील एकमेव फलंदाज असून त्याने असा कारनामा या सामन्यात दुसऱ्यांदा केला होता. त्यापुर्वी त्याने २०१०मध्ये भारताविरुद्ध असा कारनामा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

परदेशात किंग कोहलीचाच बोलबाला! दक्षिण आफ्रिकेत ९ धावा करताच तेंडुलकरला ‘या’ विक्रमात टाकणार मागे

दैव देते, कर्म नेते!!

दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये विराटने पाडलाय धावांचा पाऊस! ‘अशी’ राहिलीय ‘रनमशीन’ची कामगिरी


Next Post
Virat-Kohli-Jasprit-Bumrah

विराटने केव्हा घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? बुमराहने सांगितली 'राज की बात'

Virat-Kohli

काय दिवस आलेत! एकेवेळी पहिल्या नंबर असलेला विराट आता बीसीसीआयच्या व्हिडीओतही तिसऱ्या नंबरवर

Mohammad Siraj

कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झालेला सिराज वनडे मालिकेत खेळणार का? उपकर्णधाराचा मोठा खुलासा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143