भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू रविंद्र जडेजा याने पुनरागमन केल्यानंतर पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली. नागपूर कसोटीत त्याने सात बळी आणि एक दमदार अर्धशतक ठोकत सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केला. त्याच्या याच अष्टपैलू कौशल्यांसाठी त्याला सर असे संबोधले जाते. मात्र, मला हे नाव आवडत नसल्याचे स्वतः जडेजा याने म्हटले.
नागपूर कसोटीतील कामगिरीनंतर तो नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होता. या मुलाखतीत त्याला सर असे संबोधले गेले. मात्र, त्यावेळी त्याने आपल्याला हे नाव आवडत नसल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“लोकांनी मला माझ्या नावाने हाक मारलेली मला जास्त आवडते. कारण, मी जामनगर ला राहतो आणि मला तिथे लोक बापू नावाने हाक मारतात. तुम्ही देखील मला बापू म्हणू शकता. मला तेच आवडते. हे सर बीर मला जास्त आवडत नाही. सर म्हणाल्याने मला जास्त जास्त प्रभावित वाटत नाही. त्यापेक्षा सन्मानपूर्वक तुम्ही किंवा बापू बरे वाटते.”
जडेजा याला सर ही पदवी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने दिलेली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी धोनी त्याला सर असे संबोधलेला. प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांच्याशी जडेजा याची तुलना करण्यात आली होती. जडेजाला मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो टी20 विश्वचषकाला मुकलेला. मात्र, जवळपास पाच महिन्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. त्याने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पाच बळी मिळवले. त्यानंतर शानदार फलंदाजी करताना 70 धावांची खेळी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
(Ravindra Jadeja Said I Don’t Like Calling Me Sir Said Me Bapu)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही 6 फुट 5 इंच उंचीचा गोलंदाज घेऊन या’, राहुल द्रविड यांची चक्क पत्रकाराकडे मागणी
BREAKING: अवघ्या 30 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच गाजवलेली एसए टी20 लीग